डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर राघव - परिणीती बाप्पाच्या चरणी, मुंबईत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
आप नेते राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पांचं दर्शन घेतलं.
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई: आप नेते खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा हे सेलिब्रेटी कपल नेहमीच चर्चेत असतं. नुकतेच राघव यांच्या डोळ्यांवर लंडन येथे शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर राघव आणि परिणीती दाम्पत्य मायदेशी परतलं असून शुक्रवारी बाप्पांच्या दर्शनासाठी ते मुंबईत पोहोचले. श्री सिद्धिविनायक मंदिरात पूजा करून त्यांनी श्रीफळ आणि फळांचा नैवैद्य अर्पण केला.
advertisement
राघव चढ्ढा हे आपचे युवा नेते असून पंजाबमधून राज्यसभा खासदार आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी 24 सप्टेंबर 2023 रोजी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. तेव्हापासून हे जोडपे नेहमीच चर्चेत आहे. आता लंडनमधील डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर हे जोडपं मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलं. पारंपरिक पेहरावात त्यांनी बाप्पांचं दर्शन घेतलं.
advertisement
दरम्यान, मुंबईत असलेले सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील श्री गणेशाच्या सर्वात प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची जगभरात एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे प्रभादेवी येथील प्रसिद्ध असलेल्या आणि तमाम भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात देश विदेशातून अनेक सेलेब्रिटी मान्यवर भेट देत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 24, 2024 7:11 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर राघव - परिणीती बाप्पाच्या चरणी, मुंबईत घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, Video