Mumbai News: हॉर्न वाजवला म्हणून..., थेट 21 हजार 492 वाहनचालकांवर कारवाई, मुंबईत काय घडलं?

Last Updated:

Mumbai News: अनेकजण आपल्या वाहनांना चित्रविचित्र, कर्णकर्कश आवाज असलेले प्रेशर हॉर्न लावतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदुषण वाढ होते.

Mumbai News: हॉर्न वाजवला म्हणून..., थेट 21 हजार 492 वाहनचालकांवर कारवाई, मुंबईत काय घडलं?
Mumbai News: हॉर्न वाजवला म्हणून..., थेट 21 हजार 492 वाहनचालकांवर कारवाई, मुंबईत काय घडलं?
मुंबई: राज्यासह राजधानी मुंबईमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यावरणावर याचा परिणाम होत असल्याचं दिसत आहे. अनावश्यक हॉर्न वाजवल्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असून आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र मुंबईकरांना हॉर्नचा मोह आवरत नसल्याचे चित्र दिसत आहे. कारण, विनाकारण हॉर्न वाजवल्याबद्दल 2024 मध्ये वाहतूक पोलिसांनी 21 हजार 492 चालकांवर कारवाई केली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, अनेकजण आपल्या वाहनांना चित्रविचित्र, कर्णकर्कश आवाज असलेले प्रेशर हॉर्न लावतात. काही जण वाहनांशी छेडछाड करून हॉर्नचा आवाज वाढवतात आणि रस्त्यावर विनाकारण गोंगाट करत फिरतात. चौकातील सिग्नल ग्रीन होण्याआधीच अनेक वाहनचालक हॉर्न वाजवून गोंगाट करतात.
advertisement
याशिवाय, चौकात किंवा वळणावर गाडीचा स्पीड कमी करण्याऐवजी हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करून लोकांच्या कानठळ्या बसवल्या जातात. ध्वनी प्रदूषणामुळे कानातील पेशींना इजा होऊन बहिरेपणा येऊ शकतो. याशिवाय चिडचिडेपणा, कामाची कार्यक्षमता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, रक्तदाब, हृदयविकार व निद्रानाश यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. लहान मुलांवर देखील दुष्परिणाम होत असून अपघातांची संख्याही वाढली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रेशर हॉर्न, पॉवर हॉर्न व म्युझिकल हॉर्नवर बंदी घातलेली आहे. तरी देखील त्याचा सर्रासपणे वापर होतो. म्हणून आता वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
advertisement
गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी जोगेश्वरीमध्ये 2,558, समतानगरमध्ये 1940, नागपाड्यामध्ये 1,612, भायखळ्यामध्ये 1,590 आणि दादरमध्ये 837 चालकांवर कारवाई केली आहे. याशिवाय, बीकेसीमध्ये 205, मरीन ड्राइव्हमध्ये 108, विक्रोळीमध्ये 144, माटुंग्यामध्ये 148 आणि घाटकोपर-गोरेगावमध्ये 179 चालकांवर कारवाई झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: हॉर्न वाजवला म्हणून..., थेट 21 हजार 492 वाहनचालकांवर कारवाई, मुंबईत काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement