Aditya Thackeray:...आदित्य ठाकरे समोर आले, शेकहँड अन् संदीप देशपांडे खळखळून हसले, VIDEO

Last Updated:

न्यूज१८ लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे हे सुद्धा उपस्थितीत होते.

News18
News18
मुंबई : वरळी विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात निवडणूक लढवणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर आले. निमित्तं होतं न्यूज१८ लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमाचं. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं आणि हास्य विनोद करत चर्चाही केली.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला आता निर्णायक असं वळण मिळालं आहे. ५ जुलै रोजी मराठी मोर्चा आयोजित करण्यात आला असून दोन्ही ठाकरे बंधू त्या निमित्ताने एकत्र आले आहे. याच दरम्यान, आता मनसेसैनिक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहे. न्यूज१८ लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे हे सुद्धा उपस्थितीत होते.  न्यूज१८ लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी आदित ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली.
advertisement
मुलाखत संपल्यानंतर आदित्य ठाकरे व्यासपीठावरून खाली येत असताना संदीप देशपांडे समोर आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केलं. दोन्ही नेत्यांमध्ये जुजबी पण दोन मिनिटांसाठी चर्चाही झाली. ही भेट काही मिनिटांची असली तर राजकीय पटलवार ही मोठी घडामोड आहे.
वरळी विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांनीही निवडणूक लढवली होती. अत्यंत अटीतटीची ही निवडणूक झाली होती. या निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी मिलिंद देवरांसह संदीप देशपांडेंचा पराभव केला होता. पण, आता ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना दोन्ही नेते एकत्र पाहण्यास मिळाले.
advertisement
सकाळी संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाईंची भेट
विशेष म्हणजे, ५ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार आहेत. त्याआधी आता पडद्याआड हालचालींना वेग आला आहे. कालपर्यंत ठाकरे गटावर टीका करणारे संदीप देशपांडे हे ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांना भेटायला पोहोचले. दादर परिसरातील जिप्सी हॉटेलमध्ये दोन्ही नेते एकत्र आले. एकाच टेबलावर समोरासमोर बसून बोलले. दोन्ही नेत्यांनी एकत्र नाश्ताही केला.
मराठी बातम्या/मुंबई/
Aditya Thackeray:...आदित्य ठाकरे समोर आले, शेकहँड अन् संदीप देशपांडे खळखळून हसले, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement