Naigaon BDD Chawl: नायगाव बीडीडीच्या जागेवर 70 मजली टॉवर, म्हाडाला विक्रीसाठी किती घरं मिळणार?

Last Updated:

मुंबईतील नायगाव परिसरातील बीडीडी चाळींचा लवकरच पुनर्विकास करण्यात येणार आहे. तिथल्या बीडीडी चाळीच्या जागेवर 243 मीटर उंचीचे भव्य दिव्य टॉवर उभारले जाणार आहेत. त्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या हाय राईज कमिटीने मंजूरी दिली आहे.

News18
News18
मुंबईतील नायगाव (Naigaon) परिसरातील बीडीडी चाळींचा लवकरच पुनर्विकास करण्यात येणार आहे. तिथल्या बीडीडी चाळीच्या जागेवर 243 मीटर उंचीचे भव्य दिव्य टॉवर उभारले जाणार आहेत. त्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या हाय राईज कमिटीने मंजूरी दिली आहे. चार इमारती उभारल्या जाणार असून म्हाडाकडून इमारती उभारण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. 70 मजली तीन इमारती आणि 50 मजली एक इमारत उभारण्याचा मार्ग म्हाडाचा आता मोकळा झाला आहे. या पुनर्विकास प्रकल्पामध्ये म्हाडाकडून जवळपास 1856 विक्री योग्य घरे उपलब्ध होणार आहेत.
मुंबईमध्ये घर घेणं सामान्य व्यक्तीला शक्य नाही. त्याच अनुषंगाने म्हाडाकडून मुंबईमध्ये सामान्य व्यक्तींसाठी घरं उपलब्ध केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतल्या बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आता गगनचुंबी इमारतीमध्ये घर मिळणार आहे. चाळीतून आता ते लोकं मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहायला जाणार आहेत. दरम्यान, नायगाव बीडीडी चाळ प्रकल्पात एकूण 42 जुन्या तीन मजली चाळी असून त्यामध्ये 3,344 एकूण खोल्या आहेत. सुमारे 64 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला हा भूखंड दोन भागांत विभागला असून 'अ' भूखंडावर रहिवाशांना द्याव्या लागणाऱ्या 23 मजली इमारती बांधण्यात येणार आहे. त्या 20 इमारती दोन टप्प्यांमध्ये बांधल्या जाणार आहेत.
advertisement
त्यापैकी, आठ इमारतींचे काम वेगात सुरू असून 1 ते 10 चाळींच्या जागेवर म्हाडा विक्रीयोग्य निवासी इमारत उभारणार आहे. तर दुसऱ्या भुखंडावर म्हणजेच 'ब' भूखंडावर म्हाडाकडून विक्री योग्य सदनिका असलेले 70 मजली तीन इमारती आणि 50 मजली एक इमारत बांधली जाणार आहे. या इमारतीची उंची 243 इतकी आहे. त्याला पालिकेच्या हायराईज कमिटीची परवानगी मिळणे बंधनकारक असल्याचे एका म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाय त्यांनी ही परवानगी म्हाडाला मिळाल्याने गगनचुंबी टॉवर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. चार टॉवरमधले घरं लॉटरीच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Naigaon BDD Chawl: नायगाव बीडीडीच्या जागेवर 70 मजली टॉवर, म्हाडाला विक्रीसाठी किती घरं मिळणार?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement