Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीनिमित्त कंडक्टर आणि ड्रायव्हर्सचा सन्मान, बेस्ट विठ्ठल उपक्रमांतर्गत करण्यात आला गौरव, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
आज आषाढी एकादशीनिमित्त आपली बेस्ट आपल्याचसाठी या सामाजिक संस्थेतर्फे दादर येथील बेस्ट डेपोमध्ये बेस्ट बस कंडक्टर आणि ड्रायव्हर यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
मुंबई: आज आषाढी एकादशीनिमित्त आपली बेस्ट आपल्याचसाठी या सामाजिक संस्थेतर्फे दादर येथील बेस्ट डेपोमध्ये बेस्ट बस कंडक्टर आणि ड्रायव्हर यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि तुळशी रोप देऊन गौरवण्यात आलं.
या कार्यक्रमाबाबत माहिती देताना संस्थेचे सदस्य अथर्व नाईक म्हणाले, विठोबा जसा आपल्या भक्तांसाठी कंबरेवर हात ठेवून उभा असतो, तसंच आपले बेस्टचे कंडक्टर रोज प्रवाशांसाठी तासन्तास उभे राहतात. प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेत सेवा देणं हीसुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. म्हणूनच आम्ही बेस्ट विठ्ठल हा उपक्रम हाती घेतला आणि या सन्मानातून त्यांच्या सेवेला मान्यता दिली.
advertisement
ही संस्था गेली पाच वर्षे बेस्ट कर्मचारी आणि प्रवासी यांच्यामध्ये सकारात्मक नातं निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत आहे. बेस्टसाठी आणि प्रवाशांसाठी एक सेतू म्हणून ती काम करत असून कर्मचाऱ्यांच्या श्रमांना सामाजिक सन्मान मिळावा, हा संस्थेचा प्रमुख हेतू आहे.
advertisement
सन्मानित झालेल्या कंडक्टर आणि ड्रायव्हर्सनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, आम्हाला प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन विठोबाला भेटायला मिळालं नाही, पण आम्ही समाधानी आहोत कारण आमचे प्रवासीच आमचे विठ्ठल-रखुमाई आहेत. त्यांच्या सेवेत राहणं म्हणजेच खऱ्या अर्थाने विठोबाची सेवा करणं.
या उपक्रमामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मनात आनंद आणि अभिमानाची भावना निर्माण झाली असून, त्यांच्या सेवाभावाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 05, 2025 7:37 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीनिमित्त कंडक्टर आणि ड्रायव्हर्सचा सन्मान, बेस्ट विठ्ठल उपक्रमांतर्गत करण्यात आला गौरव, Video