Maharashtra Politics: केंद्राच्या बजेटवरून नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, म्हणाले…
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
उद्धव ठाकरेंना केंद्राच्या अर्थसंकल्पावर टीका केली होती. त्यावर आता भाजपचे खासदार माजी मंत्री नारायण राणेंनी जोरदार उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे...
मुंबई:
काही दिवसांपूर्वी केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला. मोदी सरकारच्या तिसऱ्या काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्या बजेटनंतर उद्धव ठाकरेंनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली होती. विरोधकांनी ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला होता. त्यानंतर आता खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील सडकून टीका केली आहे.
advertisement
नारायण राणे काय म्हणाले?
ठाकरेंना प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, " बजेटमधील मलाच काही कळत नाही, असं कधीकाळी उद्धव ठाकरेच माध्यमांसमोर बोलले होते. मग आता ते बजेटवर भाष्य कसं करू शकतात? यंदाचं महाराष्ट्राचं बजेट साडेचार लाख कोटींचं. उद्धव ठाकरेंच्या काळात वित्तीय तूट आणि राजकोशीय तूट मोठी होती. उद्धव ठाकरेंनी फक्त शिव्या देण्यासाठी व्यासपीठ शोधावं. देशाच्या बजेटमध्ये महाराष्ट्र दिसत नाही म्हणालेत, उद्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये कलानागर दिसत नाही म्हणतील. ठाकरेंच्या हातात टीका करण्यापलीकडे काही उरलेलं नाही" अशा शब्दांत नारायण राणेंनी ठाकरेंवर टीका केली.
advertisement
"भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टीने सादर झालेलं बजेट महत्वाचं आहे. रोजगार निर्मिती होईल, युवावर्गाला दिलासा मिळेल, उद्योजकतेला फायदा होईल, थेट परदेशी गुंतवणुकीत वाढ होईल. अशा प्रकारचं हे बजेट आहे. या काळात विरोधक टीका करत राहतील, त्यांना उत्तर देण्याची गरज नाही." असं मत नारायण राणेंनी मांडलं.
advertisement
ठाकरेंनी काय केली होती टीका?
"गेल्या दहा वर्षांत भाजपा सरकारने महाराष्ट्र ओरबाडला, मुंबईन लुटली. पण महाराष्ट्राला परत काय दिलं? या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काही दिसत नाही" असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याचबरोबर आंध्रप्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांसाठी भरीव तरतुद केली असल्याच्या मुद्द्याकडे देखील ठाकरेंनी लक्ष वेधलं होतं. ठाकरेंच्या टीकेनंतर मविआतील प्रमुख नेत्यांनी या बजेटवरून राज्य आणि केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 26, 2024 5:02 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Politics: केंद्राच्या बजेटवरून नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, म्हणाले…