advertisement

Maharashtra Politics: एकाच दिवसामध्ये ठाकरेंना 2 मोठे धक्के, ठाण्यानंतर अमरावतीतही बसला हादरा!

Last Updated:

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. सहसंपर्क प्रमुख गजानन पाटील-वाकोडे यांनी राजीनामा देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे...

News18
News18
संजय शेंडे, प्रतिनिधी
अमरावती:  ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती काही थांबताना दिसत नाही. आता अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला एका स्थानिक नेत्याने सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गजानन पाटील वाकोडे यांनी राजीनामा दिला आहे.
गजानन पाटील-वाकोडे शिंदेंच्या शिवसेनेत:
गजानन पाटील वाकोडे यांनी तडकाफडकी राजीनामा देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क गजानन पाटील बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक होते. गजानन पाटील वाकोडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या सोबत सोबत शिवसेना नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळ आणि शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ उपस्थित होते.
advertisement
गजानन वाकोडे हे दर्यापूर येथील कट्टर शिवसैनिक व सहसंपर्कप्रमुख होते. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंना दर्यापूर विधानसभा मतदारसंघात फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला काहीसा फायदा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ठाकरेंनी दिला भाजपाला धक्का:
दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे.  ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हा भाजपसाठी गोंदियात मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12: 30 वाजता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये  मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे. 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा घरवापसी करणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics: एकाच दिवसामध्ये ठाकरेंना 2 मोठे धक्के, ठाण्यानंतर अमरावतीतही बसला हादरा!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement