Mumbai : पार्सल द्यायला आला अन् नको तिथे स्पर्श केला, मुंबईत Blinkit डिलिव्हरी बॉयचं महिलेसोबत घृणास्पद कृत्य, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
Mumbai Blinkit Delivery boy Video ब्लिंकइटच्या डिलिव्हरी बॉयने मुंबईच्या महिलेसोबत संतापजनक कृत्य केलं आहे, याचा व्हिडिओ स्वत: महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Mumbai Blinkit Video : मोबाईल ऍपवरून रोजच्या वापरायच्या गोष्टी ऑनलाईन मागवण्याचं प्रमाण वाढलं आहे. जेवण तसंच रोज वापरायच्या वस्तू मोबाईलवरून ऑर्डर केल्यानंतर काही मिनिटांमध्ये तुमच्या घरी येतात, पण या वस्तू डिलिव्हर करणाऱ्यांची काही गैरकृत्यही समोर येत आहेत. मुंबईमध्ये असाच एक संतापजनक प्रकार घडला आहे. या महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात डिलिव्हरी बॉयने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचं दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ब्लिंकिट डिलिव्हरी बॉय एका महिलेला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. पीडित महिलेने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ही घटना 3 ऑक्टोबरला मुंबईमध्ये संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. महिलेने ब्लिंकिट वरून काही वस्तू मागवल्या होत्या. जेव्हा डिलिव्हरी बॉय सामान घेऊन आला, तेव्हा महिला त्याला पैसे देत होती. महिलेकडून पैसे घेताना डिलिव्हरी बॉयने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला.
advertisement
This is what happened with me today while ordering from Blinkit. The delivery guy asked for my address again and then touched me inappropriately. This is NOT acceptable. @letsblinkit please take strict action. #Harassment #Safety @letsblinkit ...is women safety is joke in India? pic.twitter.com/aAsjcT3mnO
— S🪐 (@eternalxflames_) October 3, 2025
advertisement
महिलेने शेअर केला व्हिडिओ
या महिलेने सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केला आणि ब्लिंकिटच्या अधिकृत अकाउंटला टॅग केलं. महिलेने तिच्या पोस्टमध्ये डिलिव्हरी बॉयने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचंही सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डिलिव्हरी बॉयने हे जाणूनबुजून केलं की चुकून त्याचा स्पर्श झाला? यावरून वाद सुरू झाला आहे.
advertisement
महिलेने लिहिले की, 'ब्लिंकिटवरून ऑर्डर करताना आज माझ्यासोबत असे घडले. डिलिव्हरी बॉयने पुन्हा माझा पत्ता विचारला आणि नंतर मला अयोग्यरित्या स्पर्श केला. हे सहन करता येणार नाही. कृपया कठोर कारवाई करा'. शिवाय, महिलेने तिच्या पोस्टमध्ये ब्लिंकिट आणि मुंबई पोलिसांना टॅग केले आहे, भारतातील महिलांची सुरक्षा हा विनोद आहे का? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. तिने पुढे असा दावा केला आहे की ब्लिंकिटने घटनेचे पुरावे दिल्यानंतरच डिलिव्हरी बॉयवर कारवाई केली.
advertisement
मुंबई पोलीस ऍक्शनमध्ये
मुंबई पोलिसांनीही तिच्या ट्विटला उत्तर देत लिहिले आहे की, 'आम्ही तुम्हाला फॉलो केले आहे. कृपया तुमची संपर्क माहिती डीएममध्ये शेअर करा.' दरम्यान ब्लिंकिटने या डिलिव्हरी बॉयवर कारवाई केली आहे, तसंच त्याच्यासोबतचा करारही रद्द केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 6:00 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : पार्सल द्यायला आला अन् नको तिथे स्पर्श केला, मुंबईत Blinkit डिलिव्हरी बॉयचं महिलेसोबत घृणास्पद कृत्य, Video