Mumbai Property Tax: ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात 30 टक्के सवलत? व्हायरल मेसेजचं सत्य समोर, BMCचा मोठा खुलासा

Last Updated:

सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकार गृहनिर्माण धोरण 2025 अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्तेसाठी करात 30% सवलत दिली जात असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजवर मुंबई महानगर पालिकेने मोठा खुलासा केला आहे.

Mumbai Property Tax: ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात 30 टक्के सवलत? व्हायरल मेसेजचं सत्य समोर, BMCचा मोठा खुलासा
Mumbai Property Tax: ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात 30 टक्के सवलत? व्हायरल मेसेजचं सत्य समोर, BMCचा मोठा खुलासा
सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकार गृहनिर्माण धोरण 2025 अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्तेसाठी करात 30% सवलत दिली जात असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या मेसेजेस वाचून ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये (वॉर्ड) येऊन चौकशी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्तेसाठी करात ३० टक्के सवलत देण्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे, नागरिकांनी यासंदर्भात प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड) येणे टाळावे. जेणेकरुन, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.
महानगरपालिका प्रशासनाकडून हेदेखील कळवण्यात येत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका धोरणानुसार, दिनांक १ जानेवारी २०२२ पासून ५०० चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या निवासी मालमत्तांना करसवलत दिली जाते. तसेच, माजी सैनिक, त्यांच्या विधवा आणि अविवाहित शहीद सैनिकांच्या कुटुंबियांनाही त्यांच्या एका मालमत्तेच्या करात (शासनाचे कर वगळून) सवलत देण्यात येते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Property Tax: ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात 30 टक्के सवलत? व्हायरल मेसेजचं सत्य समोर, BMCचा मोठा खुलासा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement