Mumbai News : ई- कचऱ्याच्या जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा विशेष ऊर्जा उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांचे हटके प्रदर्शन
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ई-कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऊर्जा’ या विशेष उपक्रमांतर्गत ई-कचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ई-कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऊर्जा’ या विशेष उपक्रमांतर्गत ई-कचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. करी रोड परिसरातील ना. म. जोशी शाळेत शुक्रवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
महानगरपालिकेचे उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, महानगरपालिका उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) विनायक भट, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशनचे संस्थापक धर्मेश बराई, उपस्थित राहणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी ई-कचऱ्यावर आधारित विविध प्रकल्प, वस्तू आणि उपक्रम या प्रदर्शनात सादर करतील.
advertisement
ई-कचऱ्याचा पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि व्यवस्थापन या संकल्पनांवर आधारित हे प्रकल्प नागरिकांना पर्यावरणपूरक सवयी स्वीकारण्यास आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्यास प्रोत्साहित करतील. गत काही महिन्यांपासून इलेक्ट्रोफाइन रिसायकलिंग प्रा. लि. ई-कचऱ्याचे सुरक्षित व शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करत आहेत. आतापर्यंत १५ हजार टन कचऱ्याचे पुनर्वापर करण्यात यश मिळवले आहे. या अनुभवाचा उपयोग शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून जागरूक करण्यासाठी करण्यात येत आहे. मुंबईतील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 10:01 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : ई- कचऱ्याच्या जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा विशेष ऊर्जा उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांचे हटके प्रदर्शन