VIDEO : 6,6,6,6,6...नबीचं वादळ, एका ओव्हरमध्ये 5 गगनचुंबी षटकार,बॅटींग पाहून काळजाचा ठोका चूकेल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद नबीने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये 5 गगनचुंबी षटकार लगावले आहेत
Mohammad Nabi hits 5 Six in last Over : अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद नबीने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये 5 गगनचुंबी षटकार लगावले आहेत. त्यानंतर सहावा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला होता.त्यामुळे एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम हुकला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यावेळी मोहम्मद नबी 60 धावांवर बाद झाला होता.
श्रीलंकेकडून शेवटचं षटक घेऊन वेललागे (Wellalage) आला होता. यावेळी वेलालागेच्या पहिल्याच बॉलपासून नबीने प्रहार करायला सुरूवात केली होती. त्यामुळे त्याने सुरूवातीला तीन हॅट्ट्रीक सिक्स मारले त्यानंतर एक बॉल नो पडला.त्यानंतर पुन्हा त्याने दोन षटकार मारले. त्यानंतर नबी सहा बॉल सहा सिक्सचा रेकॉर्ड करेल असे वाटत होते. मात्र शेवटच्या चेंडुवर तो रनआऊट झाला.
advertisement
Mohammad Nabi hit five consecutive sixes
6 6 6 6 6#SLvsAFG #AsiaCup2025 pic.twitter.com/DVYdHyDIXD
— Dr. Srs (@Imsrs18) September 18, 2025
काय झाले ओव्हरमध्ये...
१९.१ ओव्हर: वेललागेने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर नबीने लाँग-ऑफच्या दिशेने सहजपणे षटकार मारून जोरदार सुरुवात केली.
advertisement
१९.२ ओव्हर: वेललागेने वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. पण नबीने चेंडू ओळखला आणि डीप मिड-विकेटच्या वरून दुसरा षटकार मारला.
१९.३ ओव्हर: वेललागेने गोलंदाजीची दिशा बदलून ओव्हर द विकेट येण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नबीने पुन्हा एकदा लाँग-ऑफच्या दिशेने ८८ मीटर लांब षटकार मारून तिसरा षटकार नोंदवला.
advertisement
१९.४ ओव्हर: वेललागेने चेंडू नबीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात त्याने नो-बॉल टाकला. फ्री-हिटवरही नबी थांबला नाही आणि जोरदार फटका मारत वाईड लाँग-ऑफच्या वरून चौथा षटकार ठोकला. याच षटकाराने त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले.
१९.५ ओव्हर: नबीने आपला धडाका कायम ठेवला. वेललागेने पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकला आणि नबीने काऊ कॉर्नरच्या दिशेने प्रचंड मोठा षटकार मारत षटकातील पाचवा षटकार पूर्ण केला. यानंतर वेललागे हताश झाल्याचे स्पष्टपणे दिसले.
advertisement
१९.६ ओव्हर: एकाच षटकात सहा षटकार मारण्याच्या विक्रमापासून केवळ एक षटकार दूर असताना, वेललागेने अखेर एक अचूक यॉर्कर टाकला. नबीने तो चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारला आणि दुसऱ्या धावेसाठी धावला. पण कुशल परेराच्या चांगल्या थ्रोमुळे आणि कुशल मेंडिसने चेंडू स्टंपवर आदळून त्याला धावबाद केले.
या दरम्यान मोहम्मद नबीने 22 बॉलमध्ये 60 धावांची सर्वाधिक खेळी केली आहे. त्याच्या या वादळी खेळीमुळे अफगाणिस्तान 8 विकेट गमावून 169 धावांपर्यंत मजल मारू शकली होती.त्यामुळे आता श्रीलंकसमोर 170 धावांचे आव्हान आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 9:54 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 6,6,6,6,6...नबीचं वादळ, एका ओव्हरमध्ये 5 गगनचुंबी षटकार,बॅटींग पाहून काळजाचा ठोका चूकेल