Railway Update: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, नाताळसाठी मुंबईतून थेट मडगावला ट्रेन, पाहा वेळापत्रक आणि थांबे

Last Updated:

Central Railway: नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबईतून थेट मडगावपर्यंत ट्रेन धावणार आहे.

Railway Update: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, नाताळसाठी मुंबईतून थेट मडगावला ट्रेन, पाहा वेळापत्रक आणि थांबे
Railway Update: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, नाताळसाठी मुंबईतून थेट मडगावला ट्रेन, पाहा वेळापत्रक आणि थांबे
मुंबई: नाताळ व नववर्षाच्या सुट्यांच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी क्रमांक 22115/22116 लोकमान्य टिळक टर्मिनस–करमळी–लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेसची सेवा तात्पुरत्या स्वरूपात मडगावपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही विशेष सेवा 18 डिसेंबर ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. या निर्णयामुळे मुंबई, कोकण आणि गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नाताळ व नववर्षाच्या काळात गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते, त्यामुळे ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गाडी क्रमांक 22115 लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून दर गुरुवारी पहाटे 00.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.15 वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 22116 दर गुरुवारी दुपारी 13.50 वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 00.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
advertisement
थांबे कुठे?
या गाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत, त्यामुळे कोकणातील प्रवाशांनाही या सेवेचा लाभ होणार आहे. या विशेष गाडीच्या संरचनेमध्ये एक प्रथम वातानुकूलित डबा, तीन द्वितीय वातानुकूलित, पंधरा तृतीय वातानुकूलित डबे, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर कार यांचा समावेश आहे.
advertisement
आरक्षण सुविधा
या गाड्यांसाठीची आरक्षणे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर खुली करण्यात आली आहेत. प्रवाशांनी सविस्तर वेळापत्रक व अद्ययावत माहितीकरिता NTES ॲप किंवा भारतीय रेल्वेच्या चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Railway Update: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, नाताळसाठी मुंबईतून थेट मडगावला ट्रेन, पाहा वेळापत्रक आणि थांबे
Next Article
advertisement
BMC Election:  'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईतल्या भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी
'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी
  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

View All
advertisement