Mumbai Goa Highway crocodile : मुंबई - गोवा महामार्गावर आढळली जखमी अवस्थेत मगर; प्राणीप्रेमींकडून यशस्वी रेस्क्यू
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:mohan jadhav
Last Updated:
Raigad News : मुंबई-गोवा महामार्गावर रायगडजवळ जखमी अवस्थेत एक मगर दिसून आली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ माहिती दिल्यानंतर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मगरीचा यशस्वी रेस्क्यू करून सुरक्षिततेसाठी जंगलात सोडले.
रायगड : मुंबई-गोवा महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा राष्ट्रीय मार्ग आहे. या मार्गावर रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. अशा गजबजलेल्या मार्गावर एखाद्या वन्यप्राण्याचे दर्शन होणे हे नवे नाही, मात्र काल रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ या महामार्गावर जखमी अवस्थेत एक मगर दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली. पावसाळ्यामुळे नद्या, ओढे आणि कालवे भरून वाहत आहेत. त्यामुळे जंगली प्राणी आणि विशेषत हा मगर सारखे सरपटणारे प्राणी भरवस्तीत शिरताना अनेकदा दिसून येतात.
माणगावच्या काळ नदी परिसरात मगरींचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आढळते. या नदीला लागूनच महामार्ग जात असल्याने मुसळधार पावसात ही मगर भरवस्तीत आली असावी, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. महामार्गावर मगर आढळल्याचे लक्षात येताच काही सजग नागरिकांनी त्वरित सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेच्या रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. या टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि मगरीला सुरक्षित पकडून तिची तपासणी केली. तपासणीदरम्यान मगरीला किरकोळ जखमा झाल्याचे आढळून आले.
advertisement
वन्यजीव रक्षणार्थ संस्थेच्या सदस्यांनी तिला प्राथमिक उपचार दिले. मगरीसाठी आवश्यक औषधोपचार केल्यानंतर तिच्या आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा झाली. या मगरीला उपचारानंतर पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच काळ नदी परिसरात सोडण्यात आले. त्यामुळे या जखमी मगरीचे प्राण वाचले आणि ती पुन्हा सुरक्षितपणे नदीत परतली.
अनेकदा अशा घटना घडतात की, मुसळधार पावसात जलाशय फुगून वाहू लागतात आणि जलचर प्राणी किंवा सरपटणारे प्राणी आपल्या अधिवासातून बाहेर पडून मानवी वस्तीत शिरतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. मात्र अशा वेळी शांत राहून वन्यजीव रक्षणार्थ संस्था किंवा वनविभागाशी संपर्क साधणे हेच योग्य ठरते. स्थानिक नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे मगरीला जीवदान मिळाले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
advertisement
वन्यजीव हे निसर्गाच्या परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. मगरीसारखे प्राणी पाणथळ भागात जलचर प्राण्यांच्या संतुलनासाठी आवश्यक असतात. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचे रक्षण करणे आणि त्यांना धोका निर्माण झाल्यास योग्य ती मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. या घटनेतून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की, नागरिकांनी थोडीशी जाणीव ठेवली तर वन्यजीवांचे प्राण वाचवणे शक्य आहे.
advertisement
या घटनेने परिसरातील लोकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. कारण महामार्गावर मगर आढळल्याने सुरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण योग्य वेळेत करण्यात आलेल्या बचावामुळे आता सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
August 18, 2025 9:31 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Goa Highway crocodile : मुंबई - गोवा महामार्गावर आढळली जखमी अवस्थेत मगर; प्राणीप्रेमींकडून यशस्वी रेस्क्यू


