Mumbai : पोरं अमेरिकेत, 70 वर्षीय वडील भारतात एकटेच; त्या दिवशी एक कॉल आला अन् सर्वच संपलं; मुंबई हादरली

Last Updated:

Cyber Fraud Mumbai : मुलुंडमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 70 वर्षीय वयोवृद्धाची 40 लाखांची सायबर फसवणूक झाली.

News18
News18
मुंबई : मुलुंड परिसरात डिजिटल अरेस्टची भीती दाखवून एका 70 वर्षीय वयोवृद्धाची तब्बल 40 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पूर्व सायबर सेल पोलिसांनी चार अज्ञात सायबर ठगांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हे घडले तरी कसे?
मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे मुलुंड येथे वास्तव्यास असून त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत राहतात. डिसेंबर महिन्यात त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. कॉल करणाऱ्याने आपण ब्ल्यू डार्ट कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने बँकॉक येथे एक पार्सल पाठवण्यात आले असून त्यामध्ये ड्रग्ज सापडल्याचा दावा त्याने केला. यामुळे त्यांच्या विरोधात सायबर गुन्हा दाखल झाल्याचेही सांगण्यात आले.
advertisement
त्या एका फोन कॉलने उडाली खळबळ
यानंतर अमित नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. ड्रग्ज तस्करी करणारी मोठी टोळी असून तिचा म्होरक्या नवाब मलिक असल्याचे सांगत त्याने वयोवृद्धाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना सहकार्य न केल्यास जेल होऊ शकते अशी धमकीही देण्यात आली.
तक्रारदारांनी आपण कोणतेही पार्सल पाठवले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच कोणत्याही आमदाराला ओळखत नसल्याचे सांगितले. मात्र ठगांनी त्यांच्यावर सतत मानसिक दबाव टाकत बँक खात्याची माहिती घेतली. कारवाईच्या भीतीने त्यांनी 40 लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर केले.
advertisement
नंतर पैसे परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र रक्कम परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलीस आणि सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : पोरं अमेरिकेत, 70 वर्षीय वडील भारतात एकटेच; त्या दिवशी एक कॉल आला अन् सर्वच संपलं; मुंबई हादरली
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement