Fastag च्या नियमात बदल, १ एप्रिलपासून बदलणार, घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा

Last Updated:

१ एप्रिलपासून सर्व टोल प्लाझा कॅशलेस होणार आहेत. फक्त फास्टॅग किंवा UPI पेमेंटच चालेल. व्ही. उमाशंकर यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. डिजिटल पेमेंट नसल्यास दंड लागू शकतो.

News18
News18
तुम्ही जर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल किंवा रोजचा प्रवास असेल त्यात जर टोलनाक्याचा समावेश असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे टोलनाक्यावर आता पैसे चालणार नाहीत. थेट ऑनलाईन पेमेंट किंवा फास्टॅग दोनच पर्याय चालणार आहेत. जर तुम्ही वारंवार महामार्गावरून प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
येत्या १ एप्रिलपासून देशातील सर्व टोल प्लाझा पूर्णपणे कॅशलेस होणार आहेत. म्हणजेच, आता टोल भरण्यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी या मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. नवीन नियमानुसार, टोल नाक्यावर आता फक्त दोनच पर्यायांनी टॅक्स भरता येईल. फास्टॅग वाहनाच्या काचेवर असलेल्या फास्टॅगद्वारे स्वयंचलित कपात किंवा दुसरा पर्याय UPI पेमेंट, जर फास्टॅगमध्ये तांत्रिक अडचण आली, तर स्कॅनरद्वारे युपीआय पेमेंट करता येणार आहे.
advertisement
सध्या फास्टॅग अनिवार्य असूनही अनेक वाहनचालक रोख रकमेने टोल भरतात. सुट्या पैशांच्या देवाणघेवाणीत वेळ जातो आणि मागे वाहनांच्या रांगा लागतात. रोख व्यवहार पूर्णपणे बंद केल्यामुळे गाड्यांना टोल बूथवर थांबावे लागणार नाही, परिणामी प्रवासाचा वेळ वाचेल आणि वारंवार गाडी थांबवून सुरू करावी लागत नसल्याने इंधनाचीही मोठी बचत होईल.
सरकार सध्या देशातील २५ टोल प्लाझावर नो-स्टॉप प्रणालीची चाचणी घेत आहे. हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास भविष्यात महामार्गावर कोणतेही अडथळे नसतील. हाय-स्पीड कॅमेरे आणि सेन्सर्स धावत्या गाडीचा टोल आपोआप कापतील. १ एप्रिलचा हा निर्णय याच 'बॅरियर-मुक्त' टोलिंगच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.
advertisement
तुमच्या फास्टॅग खात्यात पुरेशी शिल्लक असल्याची खात्री करा इमर्जन्सीच्या वेळी UPI पेमेंटसाठी मोबाईलमध्ये इंटरनेट आणि अ‍ॅप सक्रिय ठेवा. १ एप्रिलनंतर जर तुमच्याकडे डिजिटल पेमेंटची सोय नसेल, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा टोल नाक्यावरून परत पाठवले जाऊ शकते.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Fastag च्या नियमात बदल, १ एप्रिलपासून बदलणार, घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement