दीर, भाऊ, मुले! नाशकात १५ मोठ्या नेत्यांच्या नातलगांचे निवडणुकीत काय झालं? कोण जिंकलं?

Last Updated:

Nashik Election 2026 : देशाच्या राजकारणात दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच पक्षांवर घराणेशाहीचा आरोप सातत्याने होत असतो. नागरिकांमध्येही “सत्ता काही मोजक्या कुटुंबांपुरतीच मर्यादित आहे” अशी भावना अनेकदा व्यक्त केली जाते.

nashik election 2026
nashik election 2026
नाशिक : देशाच्या राजकारणात दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच पक्षांवर घराणेशाहीचा आरोप सातत्याने होत असतो. नागरिकांमध्येही “सत्ता काही मोजक्या कुटुंबांपुरतीच मर्यादित आहे” अशी भावना अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात आले की हेच चित्र वेगळ्या स्वरूपात दिसते. नुकत्याच झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीतही घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत राहिला, पण मतदारांनी मोठ्या प्रमाणात या घराणेशाहीतील उमेदवारांनाच कौल दिल्याचे स्पष्ट झाले.
कोण जिंकलं? कोण पराभूत झालं?
या निवडणुकीत जुने, अनुभवी नेते, माजी नगरसेवक आणि माजी महापौर यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्याचा कल जवळपास सर्वच पक्षांत दिसून आला. विशेषतः भाजपकडून घराणेशाहीतील सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले. त्यातील अनेकांनी विजय मिळवत पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवला. माजी महापौर अशोक दिवे यांचे पुत्र प्रशांत दिवे हे पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील, माजी महापौर बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप, माजी महापौर सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या कुलकर्णी यांनीही यश संपादन केले.
advertisement
याशिवाय विनायक पांडे यांची सून आदिती पांडे, वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते, भाजप नेते विजय साने यांचे पुत्र अजिंक्य साने, सध्या तुरुंगात असलेल्या उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांनीही निवडणुकीत बाजी मारली. भाजप नेते लक्ष्मण सावजी यांची कन्या नुपूर सावजी, दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील तसेच यतीन वाघ यांच्या पत्नी हितेश वाघ यांचाही विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. या सर्व निकालांमुळे घराणेशाहीचा आरोप असतानाही मतदारांनी अनुभव, ओळख आणि स्थानिक प्रभावाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून आले.
advertisement
दरम्यान, पक्षांतर्गत पातळीवर घराणेशाहीविरोधात भूमिका घेण्याचे प्रयत्नही झाले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरे आणि आमदार देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिंक्य फरांदे यांचे तिकीट कापण्यात आले. हा निर्णय पक्षासाठी कठीण असला तरी, त्यामागे नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा हेतू स्पष्टपणे दिसून आला.
एकूणच, नाशिक महापालिका निवडणुकीत घराणेशाही आणि नव्या नेतृत्वाचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला. अनुभवी घराण्यांतील अनेकांना संधी मिळाली, तर काही ठिकाणी मतदारांनी बदलाची नोंद घेतली.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दीर, भाऊ, मुले! नाशकात १५ मोठ्या नेत्यांच्या नातलगांचे निवडणुकीत काय झालं? कोण जिंकलं?
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement