advertisement

BMC Election Results BJP: ...तर भाजपाचाही झाला असता टांगा पलटी, कोणी दिली साथ, ज्यांनी केलं मुंबईचा किंग!

Last Updated:

BMC Election Results BJP: भाजपला किंग मेकर बनवण्यात काही महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरले आहेत. जवळपास ५० वॉर्डने भाजपच्या यशात मोठी भूमिका बजावली आहे.

...तर भाजपाचाही झाला असता टांगा पलटी, कोणी दिली साथ, ज्यांनी केलं मुंबईचा किंग!
...तर भाजपाचाही झाला असता टांगा पलटी, कोणी दिली साथ, ज्यांनी केलं मुंबईचा किंग!
मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. मुंबई महापालिकेतून शिवसेना ठाकरेंच्या सत्तेला धक्का लागला असून भाजप-महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुंबई महापालिकेतील निकालाचे आकडे समोर येऊ लागले आहेत. मुंबईत भाजपने सत्ता मिळवली असली तरी त्यांचाही टांगा पलटी झाला असता. भाजपला किंग मेकर बनवण्यात काही महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरले आहेत. जवळपास ५० वॉर्डने भाजपच्या यशात मोठी भूमिका बजावली आहे.
मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी मतदारांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर आपला विश्वास कायम ठेवला असल्याचे निकालातून दिसून आले. कांदिवलीपासून मलबार हिलपर्यंत पसरलेल्या गुजरातीबहुल पट्ट्यात भाजपला ९० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहे. या मतपेढीच्या जोरावर भाजपने मुंबईत मोठी मुसंडी मारली आहे. जवळपास ४० ते ४५ जागा याच भागातील आहेत.

उत्तर मुंबई आणि उपनगरांत भाजपचा गड मजबूत

advertisement
मुंबईत २० टक्क्यांहून अधिक गुजराती आणि राजस्थानी मतदारांची संख्या आहे. निवडणूक निकालांचे विश्लेषण केले असता, जिथे या मतदारांचे प्राबल्य आहे, तिथे भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. प्रामुख्याने कांदिवली, बोरिवली, गोरेगाव, विलेपार्ले, घाटकोपर, मुलुंड आणि मलबार हिल या भागांत भाजपने विरोधी पक्षांचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे. या भागातील ९० टक्क्यांहून अधिक मते भाजपच्या पारड्यात पडल्याने या प्रभागांमध्ये भाजपला कोणत्याही मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला नाही.
advertisement

शिवसेनेलाही युतीचा फायदा

या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युती असल्याने, गुजराती मतांचा फायदा शिवसेनेलाही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गुजरातीबहुल भागातील शिवसेनेच्या उमेदवारांना या मतदारांनी मनापासून साथ दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. युतीची रणनीती या भागात यशस्वी ठरली असून मतांचे विभाजन टाळण्यात भाजप-शिवसेनेला यश आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Results BJP: ...तर भाजपाचाही झाला असता टांगा पलटी, कोणी दिली साथ, ज्यांनी केलं मुंबईचा किंग!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement