Water Cut News : मुंबईकरांवर पाणी संकट,तीन दिवस पाणी पुरवठा बंद; कोणत्या ठिकाणी येणार नाही पाणी?
Last Updated:
Mumbai Water Cut News : एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पासाठी जलवाहिनीच्या कामामुळे मुंबईतील अनेक भागांत तीन दिवस पाणीपुरवठा बंद किंवा कमी दाबाने होणार आहे.
मुंबई : मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या काही दिवसांत पाणी पुरवठा बंद राहणार असल्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. जलवाहिनी जोडणीच्या
कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
पाणी कपातीमुळे नागरिकांची तारांबळ
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या मेट्रो लाईन 7 अ प्रकल्पासाठी मुख्य जलवाहिनी वळविण्यात आली आहे. या वळविण्यात आलेल्या जलवाहिनीच्या छेद-जोडणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत के पूर्व विभागात करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजेपासून गुरुवार 22 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 44 तास चालणार आहे.
advertisement
'या' वॉर्डांमध्ये पाणी येणार नाही; पहा संपूर्ण वेळापत्रक
या कामामुळे मुंबईतील जी उत्तर, के पूर्व, एस, एच पूर्व आणि एन विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. काही ठिकाणी ठराविक वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यामुळे नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्येही बदल होणार आहे.
जी उत्तर विभागातील धारावी परिसरात सकाळी आणि सायंकाळी होणारा पाणीपुरवठा ठराविक वेळेत कमी दाबाने होणार आहे. के पूर्व विभागातील मरोळ, अंधेरी, सिप्झ, विमानतळ परिसर तसेच काही वसाहतींमध्ये या कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. काही भागांत ठराविक वेळेत कमी दाबाने पाणी मिळणार आहे.
advertisement
एस विभागातील विक्रोळी आणि भांडुप पश्चिम भागात अनेक वसाहतींमध्ये कमी दाबाने किंवा पूर्णपणे बंद पाणीपुरवठा राहणार आहे. एच पूर्व विभागातील संपूर्ण वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात रात्रीच्या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. एन विभागातील विक्रोळी पश्चिम, घाटकोपर परिसरातील काही गृहसंकुलांमध्येही ठराविक वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
महानगरपालिकेने नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून आधीच आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीच्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच पुढील काही दिवस पाणी उकळून आणि गाळून पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 2:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Water Cut News : मुंबईकरांवर पाणी संकट,तीन दिवस पाणी पुरवठा बंद; कोणत्या ठिकाणी येणार नाही पाणी?










