मुंबईतील 'या' मार्केटमध्ये फक्त दोनशेपासून मिळतायत लेडीज स्पेशल आऊटफिट्स, एकदा नक्कीच भेट द्या...
- Reported by:Namita Suryavanshi
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Dadar Hidden Market: दादर परिसरात महिलांसाठी कपड्यांची खरेदी करण्यासाठी एक वेगळं आणि फारसं कोणाला माहिती नसलेलं ठिकाण सध्या चर्चेत आलं आहे.
मुंबई: दादर परिसरात महिलांसाठी कपड्यांची खरेदी करण्यासाठी एक वेगळं आणि फारसं कोणाला माहिती नसलेलं ठिकाण सध्या चर्चेत आलं आहे. दादर स्टेशनपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर, नक्षत्र मॉलजवळ असलेल्या या हिडन प्लेसमध्ये महिलांसाठी कॉटनचे स्कर्ट आणि कॉटनच्या पँट्स फक्त 200 रुपयांत उपलब्ध आहेत. कमी किंमतीत ट्रेंडी आणि दर्जेदार कपडे मिळत असल्यामुळे अनेक महिला आणि तरुणी खास या ठिकाणी खरेदीसाठी येत आहेत.
हिडन प्लेसमध्ये, कॉटन स्कर्ट्सचा मोठा संग्रह पाहायला मिळतो. फुलकारी, कलमकारी, जयपुरी कॉटन, जयपुरी प्रिंट, इकत अशा विविध डिझाइनमधील स्कर्ट्स येथे उपलब्ध असून रंगसंगती आणि पॅटर्नमुळे हे स्कर्ट्स विशेष आकर्षण ठरत आहेत. साधे, प्रिंटेड तसेच डिझायनर लूक असलेले स्कर्ट्स एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे ग्राहकांना भरपूर पर्याय मिळत आहेत. स्कर्ट्ससोबतच इथं कॉटन आणि खादीच्या प्लाझो पँट्सही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
advertisement
पँट्सवर वेगवेगळ्या पेंटिंग्स, डिझाइन्स आणि पॅटर्न्स असून त्या दिसायला आकर्षक आणि वापरायला आरामदायी आहेत. रोजच्या वापरासाठी तसेच कॅज्युअल वेअर म्हणून या पँट्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या हिडन प्लेसमध्ये विविध रंग, डिझाइन्स आणि साइजमध्ये कपडे उपलब्ध असून कमी बजेटमध्ये चांगले कॉटन कपडे मिळत असल्यामुळे महिलांची येथे मोठी गर्दी होत आहे. दादरमध्ये खरेदीसाठी वेगळं, बजेट-फ्रेंडली आणि ट्रेंडी ठिकाण शोधणाऱ्यांसाठी नक्षत्र मॉलजवळचा हा हिडन प्लेस सध्या खास आकर्षण ठरत आहे, जिथे स्कर्ट आणि कॉटन पँट्स अवघ्या 200 रुपयांत मिळत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 9:15 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईतील 'या' मार्केटमध्ये फक्त दोनशेपासून मिळतायत लेडीज स्पेशल आऊटफिट्स, एकदा नक्कीच भेट द्या...









