Devendra Fadnavis : भाजप एकट्याच्या जीवावर जिंकू नाही शकत पण...; महायुतीबद्दल फडणवीस काय म्हणाले?
- Published by:Suraj
Last Updated:
Maharashtra Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीचे जवळपास सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. बहुतांश जागांवरील लढती स्पष्ट झाल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जवळपास उमेदवार जाहीर झाले आहेत. बहुतांश जागांवरील लढती स्पष्ट झाल्या आहेत. आता काही जागांवर उमेदवार जाहीर करणं बाकी आहे. महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढणार आहे. भाजपने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. भाजप स्वबळावर महाराष्ट्राची निवडणूक जिंकू शकत नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यात भाजप एकट्याच्या जोरावर सरकार स्थापन करू शकणार नाही. पण विधानसभा निवडणुकीत मोठा पक्ष ठरेल असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी एनडीटीव्ही मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना म्हटलं की, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीला बहुमत मिळेल. भाजप एकट्याच्या बळावर महाराष्ट्रात निवडणूक जिंकू शकत नाही पण सर्वाधिक मते आणि जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरेल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एनसीपीसोबत आम्ही महायुतीचं सरकार स्थापन करू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
advertisement
जागांच्या संख्येची भविष्यवाणी करणं मला आवडत नाही पण मी हे सांगेन की राज्यात महायुतीला बहुमत मिळेल. आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी सहज बहुमत मिळेल. अनेक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यानं मला वाईट वाटलं. पण निवडणूकपूर्व युतीत समन्वय साधावा लागतो. कोणी असं म्हणू शकत नाही की आम्हाला दुसऱ्या पक्षाची मतं हवी आहेत पण त्यांच्या उमेदवारांना एडजस्ट नाही करू शकत असंही फडणवीस म्हणाले.
advertisement
भाजपने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या असून यात 121 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. शिवसेना शिंदे गटाने आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेसुद्धा दोन याद्या जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडूनही बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 28, 2024 7:40 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Devendra Fadnavis : भाजप एकट्याच्या जीवावर जिंकू नाही शकत पण...; महायुतीबद्दल फडणवीस काय म्हणाले?








