Mumbai News : कोस्टल रोडवरुन वाहन चालवणार असाल तर सावधान, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Last Updated:
Mumbai Coastal Road Speeding Fine News : कोस्टल रोडवरील अपघात वाढत असल्याने वाहतूक पोलिसांनी वेगावर नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली आहेत. नक्की काय बदल करण्यात आलेला आहे ते पाहुयात.
मुंबई : मुंबई शहराच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा हा कोस्टल रोडला मानला जातो. पण या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.
पोलिसांचा कोस्टल रोडवर कडा पहारा
मुंबईतील कोस्टल रोडवर गेल्या काही दिवसांत भरधाव वाहनांमुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर एका तरुणीसह बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर वाहतूक पोलिसांनी वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे.
कोस्टल रोडवरील बोगद्यात काही वाहनांनी तब्बल 140 किमी प्रतितास वेग गाठल्याचे कारवाईदरम्यान समोर आले आहे. विशेषतहा रात्री उशिरा आणि पहाटे रस्ता मोकळा असताना वेगमर्यादेचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळले आहे. अनेक चालक ओव्हरटेकच्या नादात नियंत्रण गमावून अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.
advertisement
एएनपीआर कॅमेऱ्यांची करडी नजर
तसेच काही वाहनचालक बस लेन आणि आपत्कालीन मार्गिकांचा गैरवापर करत असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून अपघातांचा धोका अधिक निर्माण होत आहे. या सर्व उल्लंघनांवर लक्ष ठेवण्यासाठी एएनपीआर कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे.
कोस्टल रोडवर वाहनांची कमाल वेगमर्यादा किती?
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 8 सप्टेंबर ते 12 जानेवारीदरम्यान 61 हजार 989 ई-चलन जारी करण्यात आली असून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या मुख्य कोस्टल रोडवर 80 किमी, बोगद्यात 60 किमी आणि इंटरचेंजरवर 40 किमी प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित आहे.
advertisement
ई-चलन प्रणाली सुरू झाल्यानंतर दिवसाला 500हून अधिक चलन जारी होत असून कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कारवाईचे प्रमाण घटल्याने वेगावर नियंत्रण मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नियम तोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 11:10 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : कोस्टल रोडवरुन वाहन चालवणार असाल तर सावधान, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय







