Mira Bhayandar: इमरान हाश्मीचा ठाकरे गटात प्रवेश, विरोधकांना आता कडवी झुंज; घडामोडींना वेग
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Mira Bhayandar: मिरा भाईंदरमध्ये वारे फिरले असून भाजप आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे समोर येत आहे. मात्र सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मिरा भाईंदरमध्ये वारे फिरले असून भाजप आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे नेते इमरान हाश्मी आणि आनंद सिंग तर भाजपच्या स्वप्नाली म्हात्रे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवश केला आहे. या प्रवेशामुळे मोठी खळबळ उडाली आहे.या प्रवेशावेळी राजन विचारे, प्रभाकर म्हात्रे, निलम ढवण आणि मनोज मयेकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मिरा भाईंदरमध्ये नवे बळ मिळाले आहे. इमरान हाशमींच्या नेतृत्वाखालील हा गट राष्ट्रवादी आणि भाजपच्या गडात खिंडार पाडणारा ठरू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक नेत्यांना आपल्या गटात सामावून घेण्याच्या ठाकरे गटाच्या धोरणाला मोठे यश मिळाल्याची चर्चा स्थानीक राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार गटासाठी मोठा धक्का
advertisement
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विकास राजकीय समीकरणांमध्ये आमुलाग्र बदल घडविणारा ठरू शकतो. मीरा भाईंदर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार, महापौर, उपमहापौर व सर्वात जास्त नगरसेवक आणि बळकट संघटना होती. एकेकाळचा हा बालेकिल्ला असल्याने अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातो.
मिरा भाईंदरमधील अजित पवार गटाचे इमरान हाशमी, आनंद सिंग आणि भाजपच्या स्वप्नाली म्हात्रे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते राजन विचारे,… pic.twitter.com/kkfiYbfJUk
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 11, 2025
advertisement
मिरा भाईंदर आरक्षण सोडत
मिरा भाईंदर महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या 95 आहे. यापैकी महिलांसाठी 48 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी (एससी) 4 प्रभाग मध्ये चार जागा आरक्षित आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी (एसटी) 1 जागा एका प्रभागात आरक्षित आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी 25 प्रभागात जागा आरक्षित आहेत. सर्वसाधारण सदस्यांची संख्या 65 असून, त्यापैकी 33 महिलांसाठी राखीव आहेत.महापालिकेच्या प्रभाग निहाय जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये मीरारोड पूर्वेच्या प्रभाग 12 मधील दोन जागा खुल्या वर्गातील महिलांसाठी तर 1 जागा इत्तर मागासवर्ग साठी राखीव होऊन केवळ एकच जागा सर्वसाधारण गटात राहिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 9:22 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mira Bhayandar: इमरान हाश्मीचा ठाकरे गटात प्रवेश, विरोधकांना आता कडवी झुंज; घडामोडींना वेग


