लग्नाच्या मंडपात किंकाळ्या, वरातीतल्या मस्तीने वीराचा जीव घेतला, 6 वर्षांच्या चिमुरडीचा तडफडून मृत्यू
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
लग्नाच्या वरातीमध्ये डीजेवर नाचत असताना झालेल्या गोळीबारात 6 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ही गोळी वराच्या मित्राच्या 6 वर्षांच्या मुलीच्या डोक्याला लागली.
लग्नाच्या वरातीमध्ये डीजेवर नाचत असताना झालेल्या गोळीबारात 6 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ही गोळी वराच्या मित्राच्या 6 वर्षांच्या मुलीच्या डोक्याला लागली. यानंतर तिला खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, पण वाटेमध्येच तिचा मृत्यू झाला. राजस्थानच्या खैरथल-तिजारा येथील मुंडावर येथे ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जसई गावात लग्नानिमित्त डीजेच्या तालावर वरातीमधील लोक नाचत होते, तेव्हाच गोळीबार झाला यातली एक गोळी वरातीमधील मुलीच्या डोक्याला लागली, यानंतर जयपूरला उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
पोलीस स्टेशनचे प्रमुख महावीर सिंह शेखावत यांनी सांगितले की, 22 नोव्हेंबर रोजी गावात राजेश जाटचा विवाह होणार आहे. लग्नापूर्वी 'बाण' (विवाहपूर्व विधी) समारंभ आयोजित करण्यात आला होता. राजेशचा मित्र, त्याच गावातील सतपाल मीणा, त्याची मुलगी, वीरा (6) आणि कुटुंबासह समारंभाला आला होता. पाच ते सात तरुण पिस्तूल घेऊन डीजेवर नाचत होते.
advertisement
मुलगी घराच्या अंगणात उभी होती
मुलीचे वडील सतपाल म्हणाले, 'घराच्या गेटवर डीजे वाजत होता. त्यावेळी मी डीजेपासून थोड्या अंतरावर उभा होतो. वीरा अंगणात होती. त्यानंतर मला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. मला आतून ओरडण्याचा आवाज आला, म्हणून मी अंगणात पळत गेलो. मुलगी रक्ताने माखलेली तिथेच पडली होती. वीराचे मामा शिवकुमार म्हणाले, 'डीजेवर नाचत असताना सतत गोळीबार सुरू होता. यादरम्यान मुलीला गोळी लागली.'
advertisement
जयपूरला नेत असताना मुलीचा मृत्यू
गोळीबाराच्या घटनेमुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुलीला प्रथम गंभीर अवस्थेत नीमराणा रुग्णालयात नेण्यात आले, तेथून तिची प्रकृती बिघडल्याने तिला जयपूरला रेफर करण्यात आले. पण, वाटेतच वीराचा मृत्यू झाला.
फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. पोलीस स्टेशन प्रभारी म्हणाले, 'पीडित कुटुंबाकडून तक्रार येताच कठोर कारवाई केली जाईल. गोळीबार करणाऱ्या तरुणाचा आणि शस्त्राचा शोध घेतला जात आहे.' मुलीचे वडील सतपाल मीणा भिवाडी येथे वाहतूक विभागात अतिरिक्त प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वीराला एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण आहे.
view commentsLocation :
Jaipur,Rajasthan
First Published :
November 18, 2025 9:14 PM IST
मराठी बातम्या/देश/
लग्नाच्या मंडपात किंकाळ्या, वरातीतल्या मस्तीने वीराचा जीव घेतला, 6 वर्षांच्या चिमुरडीचा तडफडून मृत्यू


