Guess Who : पोटासाठी चालवायचा ऑटोरिक्षा, 100 रुपयांत सुरू केला अभिनयाचा प्रवास, 'सिंघम' फेम अभिनेता आज कोट्यवधीचा मालक

Last Updated:
Celebrity Struggle Life : एकेकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी ऑटो रिक्षा चालवणारे बोस वेंकट आज तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत एक मोठे नाव आहेत.
1/7
मुंबई: चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांच्या आयुष्यात असे नाट्यमय ट्विस्ट येतात की, सामान्य माणूस थक्क होतो. असाच प्रवास आहे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक बोस वेंकट यांचा. एकेकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी ऑटो रिक्षा चालवणारे बोस वेंकट आज तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत एक मोठे नाव आहेत. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या एका खास 'गुरू'बद्दल त्यांनी नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

advertisement
2/7
अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन बोस वेंकट वयाच्या १७ व्या वर्षी चेन्नईला आले. डोळ्यात स्वप्ने होती, पण भूक भागवण्यासाठी त्यांना काम करणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत त्यांनी शहरात ऑटो चालवण्याचा व्यवसाय सुरू केला. ऑटो चालवतानाही त्यांना जागतिक चित्रपट पाहण्याचा छंद होता.

3/7
 ऑटो चालवत असतानाच त्यांना टीव्हीवर 'मेटी ओळी' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि ते छोट्या पडद्यावर आले. त्यानंतर २००३ मध्ये भारतीराजा दिग्दर्शित 'ईर निलम' या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 'शिवाजी', 'सिंघम', 'को' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

4/7
बोस वेंकट यांनी त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे त्यांचे गुरु गोपाली ऊर्फ नारायणस्वामी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली.

5/7
त्यांच्या अभिनयाच्या स्वप्नाबद्दल कळताच गोपाली हसून निघून गेले. थोड्या वेळाने वेंकट जेव्हा खाकी वर्दी घालून ऑटो घेऊन उभे होते, तेव्हा गोपालींनी त्यांना पाहिले आणि ते वेंकटच्या ऑटोतून घरी गेले.

6/7
घरात बोलावले: घरी पोहोचल्यावर गोपालींनी वेंकटला आत बोलावून थेट पूजा घरात नेले आणि म्हणाले,
घरात बोलावले: घरी पोहोचल्यावर गोपालींनी वेंकटला आत बोलावून थेट पूजा घरात नेले आणि म्हणाले, "तू मोठा अभिनेता होशील." गोपाली यांनी तेव्हा खुलासा केला की, ते दूरदर्शनचे माजी संचालक आणि फिल्म चेंबरमधील पहिले अभिनयाचे शिक्षक होते. "रजनीकांत, चिरंजीवी यांसारख्या कलाकारांना मी शिकवले आहे आणि रजनीकांतला सर्वात आधी बालचंदर सरांना मीच भेटवले," असे गोपाली म्हणाले.
advertisement
7/7
दुसऱ्या दिवसापासून वेंकट १०० रुपये आणि विड्याचे पान घेऊन गोपालींकडे अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी जाऊ लागले. ते ऑटो चालवत शिक्षण घेत राहिले. अभिनयात यश मिळाल्यावर गोपालींनी तीच १०० रुपयांची नोट वेंकटला भेट म्हणून दिली. बोस वेंकट यांनी त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय गोपाली यांना दिले आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement