बाप्पाच्या दर्शनात कार्यकर्त्यांचा उत्साह नडला, मंत्री उदय सामंत यांचा जीव थोडक्यात वाचला पाहा VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
वांद्र इथे बाप्पाच्या दर्शनासाठी उदय सामंत आल्यानं कार्यकर्त्यांनी अति उत्साहात फटाके फोडले, कार्यकर्त्यांचा हाच अति उत्साह नडला आणि तो उदय सामंत यांच्या जीवावर बेतात बेतता राहिला, थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा video
मुंबई: गणेशोत्सवानिमित्ताने मंत्री उदय सामंत वेगवेगळ्या ठिकाणी गणपती दर्शनासाठी जात आहेत. वांद्रे इथे गणपती दर्शनासाठी गेले असता त्यांच्यासोबत मोठी दुर्घटना होता होता टळली. सुरक्षा रक्षक आणि तिथल्या लोकांमुळे मोठा अपघात टळला. गणेशोत्सवानिमित्त मुंबईत वांद्रे येथील गणेश मंडळांच्या गणपती दर्शनासाठी आलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत एक अनपेक्षित घटना घडली.
उत्साही कार्यकर्त्यांनी मंत्री उदय सामंत आल्यानं मोठ्या आनंदाने फटाके फोडले. यावेळी एक फटका सामंत यांच्या पायाजवळच फुटला, ज्यामुळे आग लागली. मात्र, प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकांनी त्यांना आगीपासून दूर नेत वाचवलं. ते गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत जात असताना अचानक फटाके फोडल्यामुळे ही घटना घडली. सुरक्षा रक्षकांनी लगेच त्यांना बाजूला केल्यानं मोठा अनर्थ टळला.
advertisement
त्यांच्या पायाजवळ एका फटाक्याचा स्फोट झाला आणि आग भडकली. यामुळे काही क्षणांसाठी गोंधळ निर्माण झाला. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मंत्री उदय सामंत गणेशोत्सवानिमित्ताने कार्यकर्त्यांच्या घरी, सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी जात आहेत. गुरुवारी रात्री वांद्रे इथे ते दर्शनासाठी गेले असताना हा प्रसंग घडला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
advertisement
गणेशोत्सवानिमित्त खार ईस्ट येथील खारचा महाराजा मंडळाला भेट दिली. यावेळी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. गणपती बाप्पाच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धी, प्रगती आणि आरोग्यसंपन्न आयुष्याची प्रार्थना केली. या प्रसंगी शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गणेश भक्त उपस्थित होते अशी उदय सामंत यांनी रात्री ट्विट करुन माहिती दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 8:31 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
बाप्पाच्या दर्शनात कार्यकर्त्यांचा उत्साह नडला, मंत्री उदय सामंत यांचा जीव थोडक्यात वाचला पाहा VIDEO