Eknath Shinde Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण जीआरवरून भुजबळ नाराज, पण एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Last Updated:

Eknath Shinde Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या जीआरवर छगन भुजबळ यांनीदेखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळांच्या या नाराजीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Eknath Shinde Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण जीआरवरून भुजबळ नाराज, पण एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
Eknath Shinde Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण जीआरवरून भुजबळ नाराज, पण एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई: मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आमरण उपोषण आंदोलनानंतर राज्य सरकारने तीन शासकीय आदेश काढत मागणी मान्य केली. सरकारच्या तीन आदेशानंतर ओबीसी समाजामध्ये नाराजी सुरू झाली आहे. राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनीदेखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळांच्या या नाराजीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
advertisement
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याने या प्रवर्गातील इतर समाजावर अन्याय होईल अशी भीती ओबीसी नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. मराठा समाजाला आता सरकारच्या जीआरनंतर ओबीसीतून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ कमालीचे अस्वस्थ झाले. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीवरही भुजबळ यांनी बहिष्कार घालत आपली नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे महायुतीच्या कॅबिनेट बैठकीआधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची प्री-कॅबिनेट बैठक झाली. त्याला भुजबळ उपस्थित होते. 
advertisement

जीआरवरून आपण नाराज...

'न्यूज 18 लोकमत'सोबत बोलताना छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. भुजबळ यांनी म्हटले की, ओबीसीमध्ये धक्का लावणार नाही असं सांगत आहे. एवढ्या मोठ्या समाजामध्ये मराठ्यांना आणताय, त्यामुळे साहजिक साधा माणूस सुद्धा सांगेल. मराठा आरक्षण जीआर काढण्यावरून मी नाराज आहे. आरक्षणाचा मसुदा उपसमितीने परस्पर तयार केला मुख्यमंत्र्यांना दाखवला. मंत्रीमंडळाला दाखवला नाही. येत्या काळात ओबीसी समाज आंदोलनाचं रन पेटवणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले.
advertisement
मुळात त्या दिवशी हा मसुदा कुणालाही विचारात न घेता घेतला आहे. हरकती सुचना काहीच मागवल्या नाही, त्यामुळे लगेच निर्णय घेतला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
मुंबई आंदोलनामुळे तणावपूर्ण परिस्थितीत निर्माण झाली होती. पोलीस फौजफाटा आला होता. या तणावाच्या परिस्थितीत लगेच कारवाई झाली आणि निर्णय घेतला. एका तासामध्ये जीआर बदलण्यात आला आहे. हे विशिष्ट पद्धतीने झालं आहे. हा निर्णय आम्हाला दाखवण्यात सुद्धा आला नाही. ही अशारित्याने तुम्हाला कोणत्या समाजाला आरक्षण देण्याची पद्धत नाहीये. त्यासाठी कोर्ट आहे, हे सगळं आपल्याला पटलं नसल्याचे भुजबळांनी सांगितलं.
advertisement

एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट...

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा दावा केला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'च्या एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या जीआर काढण्याच्या वेळी काय झालं, याची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मराठा समाजास इतर मागास इतर प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र देण्याबाबत हैदराबाद गॅझेटमधील नोंदी ग्राह्य धरण्याबाबतचा शासन निर्णय करण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मी आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, त्याशिवाय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली असल्याचे भुजबळ यांनी म्हटले.
advertisement
एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबतच्या शासन निर्णयाची भुजबळ यांना पूर्वकल्पना असल्याचे त्यांनी म्हटले. मराठा आरक्षणाचा विषय आता संपला असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण जीआरवरून भुजबळ नाराज, पण एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement