Weather Alert: पश्चिम महाष्ट्रातील हवामानात मोठे बदल, पुण्यासह 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आज घाटभागात पावसाचा जोर राहणार असून उर्वरित जिल्ह्यांत वेगळी स्थिती राहील.
advertisement
advertisement
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात गुरुवारी पावसाची उघडीप राहिली. तसेच कमाल तापमानाचा पारा 28.3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 28 अंशावर स्थिर राहील.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 0.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस पर्यंत वाढले आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 24 अंशावर राहिल. कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्‍यता आहे.
advertisement
advertisement
advertisement









