Ganpati Special Modi Express: गणपती स्पेशल ‘मोदी एक्स्प्रेस’; तिकीट, जेवण सगळंच FREE, बुकिंग कुठं?

Last Updated:

Ganpati Special Modi Express: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक खूशखबर आहे. यंदा 2 गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस मोफत धावणार आहेत.

Ganpati Special Modi Express: गणपती स्पेशल ‘मोदी एक्स्प्रेस’; तिकीट, जेवण सगळंच FREE, बुकिंग कुठं?
Ganpati Special Modi Express: गणपती स्पेशल ‘मोदी एक्स्प्रेस’; तिकीट, जेवण सगळंच FREE, बुकिंग कुठं?
मुंबई: गणेशोत्सव काळात मुंबई, ठाण्यातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. याच गणेशभक्तांसाठी खूशखबर आहे. यंदा देखील गणपती विशेष मोदी एक्स्प्रेस धावणार आहे. या उपक्रमाचे यंदाचे 13 वे वर्ष असून कोकणवासीयांसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज आहेत, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस ही विशेष रेल्वे सेवा गेल्या 12 वर्षांपासून सुरू आहे. यंदा ही सेवा खास असून गणेशभक्तांसाठी दोन ट्रेन धावणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने भारतीय जनता पार्टी आणि राणे कुटुंबाला भरभरून दिले आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडीच्या जनतेने तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. त्यामुळे यंदा कोकणवासीयांसाठी 2 विशेष ट्रेन सोडणार असून भक्तांसाठी मोफत जेवण आणि पाण्याची व्यवस्था केल्याचेही राणे यांनी सांगितले.
advertisement
वेळापत्रक काय?
मोदी स्पेशल एक्स्प्रेस ही 23 आणि 24 ऑगस्ट 2025 या दोन दिवशी सकाळी 11 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहेत. या ट्रेनचे तिकीट वाटप सोमवारी 18 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करावी लागणार आहे.
advertisement
शनिवार 23 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 11 वाजता मोदी एक्स्प्रेस सुटेल. ही ट्रेन रत्नागिरी आणि कुडाळला थांबेल. या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल. तसेच रविवार 24 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 11 वाजता सुटणारी ट्रेन वैभववाडी आणि कणकवली येथे थांबेल.
advertisement
दरम्यान, या डबल धमाका स्पेशल मोदी एक्स्प्रेसचा लाभ सर्व कोकणवासीयांना घ्यावा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Ganpati Special Modi Express: गणपती स्पेशल ‘मोदी एक्स्प्रेस’; तिकीट, जेवण सगळंच FREE, बुकिंग कुठं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement