Ganeshotsav 2025: थायलंड-दुबई परवडलं, पण कोकण नाही, विमान तिकिटाचा दर पाहिलात का?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Goa Flight: गणेशोत्सवात लवकर कोकणात जाण्यासाठी अनेकजण मुंबई-गोवा विमान प्रवासाचा विचार करतात. पण या मार्गावरील तिकीट दर थायलंड, दुबईपेक्षा महागले आहेत.
मुंबई: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून लाखो चाकरमानी कोकणात जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि रेल्वेचे बुकिंग मिळत नसल्याने अनेकजण हवाई प्रवासाला प्राधान्य देत आहेत. मात्र, मागणी वाढल्याने विमान आणि खासगी बसच्या तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मुंबई-गोवा विमानाचं तिकीट थायलंड-दुबईपेक्षा महागलंय.
कोकणचा विमान प्रवास महागला
गणेशोत्सवात कोकणात लवकर जाण्यासाठी अनेकजण विमान प्रवासाचा पर्याय निवडतात. मात्र, मुंबईहून गोव्याला विमानाने जाण्यासाठी तिकीट दरांत मोठी वाढ झाली आहे. सध्या हा खर्च थायलंड किंवा दुबईला जाण्यापेक्षाही जास्त आहे. मुंबई – गोवा विमानाचे तिकीट साधारणपणे 3 हजार रुपये आहे. परंतु, गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी हेच तिकीट 27 हजार रुपयांवर गेले आहे. अर्थात मुंबई-गोवा तिकीट दरांत तब्बल सात पटींनी वाढ झाली आहे.
advertisement
खासगी बसच्या तिकीट दरांत वाढ
विमानाबरोबरच खासगी बसच्या तिकीट दरांत देखील जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. कोकणात जाण्यासाठी खासगी बसचे तिकीट 1500 ते 1600 रुपये असते. परंतु, आता गणेशोत्सव काळात हेच तिकीट 3 हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळ प्रवाशांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
advertisement
रेल्वे बुकिंग अन् वाहतूक कोंडीची समस्या
view commentsमुंबईहून कोकणात जाण्यासाठी जादा रेल्वेची सोय करण्यात आली आहे. तरीही प्रवाशांची संख्या लक्षात घेता वेळेत आणि सोयीने बुकिंग मिळणे कठीण होत आहे. तर मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासाला देखील जास्त वेगळ लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोडींचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परस्थितीत विमान प्रवासाचा विचार करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे गणेशभक्तांत नाराजीचे वातावरण आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2025 9:10 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ganeshotsav 2025: थायलंड-दुबई परवडलं, पण कोकण नाही, विमान तिकिटाचा दर पाहिलात का?


