Ganeshotsav 2025: गणपतीत कोकणात जायचं? आधी ‘ही’ बातमी वाचा, तिकीट मिळणं शक्य नाही!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Konkan Railway: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता गणपतीत गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीट मिळणं कठीण असणार आहे.
मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे या काळात रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी असते. यंदा रेल्वे प्रवास आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी ‘रिग्रेट’ झाला. सोमवारी सकाळी 8 वाजता 22 ऑगस्टच्या प्रवासासाठी आरक्षण सुरू होताच कोकणातील सर्व प्रमुख गाड्यांचे तिकीट काही मिनिटांत संपले. त्यामुळे चाकरमान्यांकडून गणपती स्पेशल गाड्यांची मागणी होत आहे.
यंदा गणपती बाप्पांचे आगमन 27 ऑगस्ट रोजी होत असून त्याआधीच चाकरमानी कोकणात रवाना होतात. विशेष म्हणजे यावर्षी 22 आणि 23 ऑगस्टला चौथा शनिवार व रविवार असल्याने शासकीय सुट्ट्या आहेत. त्यामुळे शुक्रवारीच चाकरमानी गाव गाठण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर 22 ऑगस्टची सर्व नियमित गाड्यांची तिकिटे अवघ्या काही मिनिटांत संपली. तसेच कोकणकन्या, मांडवी आणि तुतारी एक्स्प्रेससह वंदे भारत आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला देखील प्रचंड वेटिंग लागले आहे.
advertisement
मुंबई महानगरातून दरवर्षी सुमारे 12 ते 13 लाख चाकरमानी गणपतीसाठी कोकणात जातात. रेल्वे प्रवास अधिक स्वस्त, आरामदायी आणि सुरक्षित असल्याने चाकरमान्यांची याच प्रवासाला पसंती असते. परंतु, गणपती स्पेशल गाड्यांची वेळेत घोषणा न झाल्याने अनेकांना नियमित गाड्यांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे जादा गाड्यांची घोषणा लवकरात लवकर करावी, अशी मागणी चाकरमान्यांकडून होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 9:46 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ganeshotsav 2025: गणपतीत कोकणात जायचं? आधी ‘ही’ बातमी वाचा, तिकीट मिळणं शक्य नाही!


