मोठी बातमी! ट्रेनखाली अचानक आला तरुण, हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गोवंडी आणि चेंबूर दरम्यान रेल्वेखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, पोलीस तपास सुरू, प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही हार्बर मार्गावरुन प्रवास करणार असाल तर वेळापत्रक पाहून बाहेर पडा. याचं कारण म्हणजे वाहतूक विस्कळी झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली असून, गोवंडी आणि चेंबूर दरम्यान एका व्यक्तीचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून लोकल ट्रेन काही वेळासाठी थांबली होती. मात्र आता धीम्या गतीनं पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
मानखुर्दवरून गोवंडीकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ती व्यक्ती रेल्वेखाली कशी आली, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागेल, असे सांगण्यात येत आहे.
पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम करत आहेत आणि या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. गोवंडी, चेंबूर मार्गावर बऱ्याचदा प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून देखील जात असतात. त्यादरम्यान ही दुर्घटना घडली असावी का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. तर रेल्वे रुळ ओलांडून जाऊ नये, त्याऐवजी पायऱ्यांचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 1:50 PM IST