Mumbai News : मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांची माहिती आता ऑनलाईन डॅशबोर्डवर!

Last Updated:

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. पावसाळ्यात ही कामे तात्पुरती थांबवण्यात आली होती. मात्र येत्या १ ऑक्टोबरपासून ही कामे पुन्हा सुरू होणार आहेत. या वेळी नागरिकांना अधिक पारदर्शक माहिती देण्यासाठी आणि गैरसमज टाळण्यासाठी पालिकेने विशेष ऑनलाईन डॅशबोर्ड तयार केला आहे.

मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांची माहिती आता ऑनलाईन डॅशबोर्डवर!
मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांची माहिती आता ऑनलाईन डॅशबोर्डवर!
मुंबई महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. पावसाळ्यात ही कामे तात्पुरती थांबवण्यात आली होती. मात्र येत्या १ ऑक्टोबरपासून ही कामे पुन्हा सुरू होणार आहेत. या वेळी नागरिकांना अधिक पारदर्शक माहिती देण्यासाठी आणि गैरसमज टाळण्यासाठी पालिकेने विशेष ऑनलाईन डॅशबोर्ड तयार केला आहे.
या डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या विभागातील रस्त्यांचे काम कधी सुरू होणार कुठपर्यंत पोहोचले आहे आणि पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे याची माहिती मिळणार आहे. https://roads.mcgm.gov.in/publicdashboard/ या संकेतस्थळावर विभागनिहाय व परिमंडळनिहाय कामांची सविस्तर माहिती पाहता येते.
advertisement
यामध्ये पूर्ण झालेली कामे सध्या सुरू असलेली कामे आणि अद्याप सुरू न झालेल्या रस्त्यांची यादी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाळ्यानंतर कोणत्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू होणार आहे आणि त्यासाठी किती कालावधी लागेल याचेही अंदाजित वेळापत्रक यावर पाहता येते. नागरिक विशिष्ट रस्त्याचे नाव टाकून शोध घेऊ शकतात किंवा नकाशावरून थेट क्लिक करून देखील माहिती मिळवू शकतात.
advertisement
तसेच, मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.mcgm.gov.in) ‘नागरिकांकरीता’ या विभागातील ‘Mega CC Road Works Progress’ या लिंकवरूनही काँक्रीटीकरण प्रकल्पाची सविस्तर माहिती मिळते.
गेल्या काही महिन्यांत काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. अनेक ठिकाणी रस्ते एकाच वेळी खोदल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती आणि पादचाऱ्यांना देखील त्रास झाला होता. या पार्श्वभूमीवर विधानमंडळातही हा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यामुळे पालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
advertisement
या सर्व गोष्टींचा विचार करून पालिकेने यंदा कामांमध्ये पारदर्शकता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले की कामे दर्जेदार केली जातील आणि नागरिकांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांची माहिती आता ऑनलाईन डॅशबोर्डवर!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement