'मराठी नसलेल्यांनीच अप्लाय करा', मुंबईतल्या जाहिरातीने वाद, मनसेचा खळखटॅकचा इशारा, शिवसेनाही आक्रमक

Last Updated:

मुंबईत मराठी माणसावर अन्याय झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यामध्ये आता आर्या गोल्ड या कंपनीने एक वादादीत जाहिरात काढली आहे, त्यामध्ये फक्त परप्रांतीय उमेदवार पाहिजेत अशी जाहिरात असल्याने वाद निर्माण झाला आहे...

News18
News18
मुंबई: मुंबईत बऱ्याचदा मराठी माणसांना नोकरी नाकारल्याची तसेच जाहिरातीतून मराठी माणसाला वगळल्याच्या बातम्या समोर येत असतात. आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरातील मरोळ नाका येथील आर्या गोल्ड या कंपनीने नोकरीची एक जाहिरात काढली आहे. त्यावरून आता वाद पेटला आहे.
जाहिरातीत काय?
या जाहिरातीत त्यांनी ' फक्त परप्रांतीयांसाठी नोकरी' अशी अट घातली आहे. आम्हाला केवळ नॉन-महाराष्ट्रीयनपुरूष उमेदवार पाहिजेत असं कंपनीने म्हटलं आहे. या जाहिरातीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात राहून यांची इतकी हिंमत कशी होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुष्मा अंधारे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या जाहिरातीवर संताप व्यक्त केला आहे. या कंपन्यांवर राज्य सरकारचा वचक असायला हवा, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. जर या कंपन्यांनी सरकारला जुमानलं नाही तर त्यांची वीज जोडणी व पाणी बंद करा अशी मागणी देखील देशपांडे यांनी केली आहे.
advertisement
सुषमा अंधारे भडकल्या:
ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स  पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “जमीन, वाहतूक, वीज, कच्चा माल, या सगळ्या गोष्टी मुंबई आणि  महाराष्ट्रातील चालतील. या राज्याच्या जीवावर तुम्ही मोठे होणार. परंतु, महाराष्ट्रातला मराठी माणूस यांना चालणार नाही. आर्या गोल्ड कंपनीच्या जाहिरातीत नॉन महाराष्ट्रीयन अशी प्रमुख अट घालण्यात आली आहे. महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्रासाठी आहे की गुजराती लोकांसाठी? " असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर उपस्थित केला आहे.
advertisement
शासनाने सवलती रद्द कराव्यात -देशपांडे
मनसे नेते संदीप देशपांडेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "अशी जाहिरात प्रसिद्ध करत असतील तर महाराष्ट्र शासनाने त्यांना दिलेल्या सर्व सवलती रद्द करायला हव्यात. सरकार काही कारवाई करणार नसेल तर मनसे आपल्या पद्धतीने कारवाई करेल" असा सज्जड दम देखील देशपांडे यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
'मराठी नसलेल्यांनीच अप्लाय करा', मुंबईतल्या जाहिरातीने वाद, मनसेचा खळखटॅकचा इशारा, शिवसेनाही आक्रमक
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement