Ladki Bahin Yojana 2024: लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत तब्बल 47,870,00,0000 रुपये जमा!
- Published by:sachin Salve
Last Updated:
जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित 3 हजार रुपयांची रक्कम डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचं उद्दीष्ट आहे.
मुंबई: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. मागील दोन महिन्यांमध्ये राज्यभरात ज्या महिलांनी अर्ज भरले आहे, अशा महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
आज गुरुवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये किती महिलांना लाभ मिळाला याची माहिती देण्यात आली आहे.
जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित 3 हजार रुपयांची रक्कम डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचं उद्दीष्ट आहे. त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहे. नवी मुंबई इथं अर्ज भरतांना केलेल्या गैरप्रकारासाठी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्याची माहिती यावेळी देण्यात आली.
advertisement
दरम्यान, राज्य सरकारने अर्जांसाठी आता मुदतवाढ दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. एवढंच नाहीतर योजनेबाबत राज्यभरात असलेला प्रचंड उत्साह पाहून सरकारने नारी शक्ती दूत ॲप लाँच केलं आहे. या अॅपवरुन महिलांना घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
जाणून घ्या कसा भरावा अर्ज (Step By Step Process for Online Form Submission For Ladki Bahin Yojana )
advertisement
- ऑनलाईन कसा भरायचा अर्ज
- तुम्हाला नारीशक्ती दूत App डाऊनलोड करायचं आहे.
- ॲप डाउनलोड झाल्यावर तुमची माहिती भरा आणि प्रोफाइल तयार करा.
- तुमचे नाव आणि इतर माहिती काळजीपूर्वक भरा.
- योजनेसाठी अर्ज करणारी महिला कोणत्या वर्गात बसणारी आहे याची माहिती देणं बंधनकारक आहे.
- मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजनेवर क्लिक करा आणि नाव, पत्ता, बँक खाते तपशील भरा.
- अर्जदाराचा लाईव्ह फोटो अपलोड करा.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि नंतर सबमिट करा.
- तुम्हाला अर्ज पूर्ण झाल्याचा मेसेज येईल.
- एकदा फॉर्म भरल्यानंतर पुन्हा तो एडीट करता येणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक भरा
advertisement
काय आहेत अटी? (What are the terms and conditions?)
21 ते 65 वर्षांपर्यंतच्या महिला अर्ज करू शकतात
महाराष्ट्रातील रहिवासी असावेत
उत्पन्न अडीच लाख असावं, विधवा, विवाहित महिला, घटस्फोटित महिला याचा लाभ घेऊ शकतात
महिलेकडे स्वत:चं बँक खातं असावं
कोणते कागदपत्र आवश्यक (Imp Documents for Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana )
आधार कार्ड.
advertisement
महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र/जन्माचा दाखला, महाराष्ट्रात रहिवासी असल्याचा पुरावा
सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न प्रमाणपत्र
बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची फोटोकॉपी
पासपोर्ट साइजचे फोटो
रेशन कार्ड
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2024 7:43 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ladki Bahin Yojana 2024: लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत तब्बल 47,870,00,0000 रुपये जमा!