Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, वीकेंडसाठी मुंबई-मडगाव स्पेशल ट्रेन, बुकिंग कधी?

Last Updated:

Konkan Railway: प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते मडगाव वीकेंड स्पेशल ट्रेन धावणार आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, वीकेंडसाठी मुंबई-मडगाव स्पेशल ट्रेन, कधी सुरू होणार बुकिंग?
Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, वीकेंडसाठी मुंबई-मडगाव स्पेशल ट्रेन, कधी सुरू होणार बुकिंग?
मुंबई: स्वातंत्र्यदिन आणि त्यानंतर लागोपाठ येणाऱ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. कोकण मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) मुंबई ते मडगाव वीकेंड स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार असून 12 ऑगस्टपासून बुकिंग सुरू होईल.
वेळापत्रक
गाडी क्रमांक 01502 मडगाव एलटीटी स्पेशल ट्रेन 17 ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता मडगावहून सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ती एलटीटी येथे पोहोचेल. तर परतीसाठी गाडी क्रमांक 01501 ही एलटीटी मडगाव ट्रेन 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता एलटीटीहून सुटेल. त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता ही ट्रेन मडगावला पोहोचेल.
advertisement
थांबे कुठं?
वीकेंड स्पेशल मुंबई-मडगाव ट्रेनला कोकण मार्गावर विविध ठिकाणी थांबे असणार आहेत. करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पणवेल आणि ठाणे या स्थानकांवर गाडी थांबेल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, वीकेंडसाठी मुंबई-मडगाव स्पेशल ट्रेन, बुकिंग कधी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement