कोकणातील प्रसिद्ध भरलेले खेकडे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल; जाणून घ्या, या आवडीच्या पदार्थाची रेसिपी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
इतर ठिकाणी ही रेसिपी नेमकी कशी करतात, हे अनेकांना कदाचित माहिती नसेल. त्यामुळे या खेकड्यांची रेसिपी नेमकी कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी अलिबागच्या राधाबाई पाटील या गृहिणीसोबत लोकल18 च्या टीमने संवाद साधला.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : श्रावण महिन्यापूर्वी गटारीचा सण येतो. याच गटारीनिमित्त कोकणात स्पेशल बनवला जाणारा पदार्थ म्हणजे भरलेले खेकडे. तिथल्या लोकांचा हा पदार्थ म्हणजे जीव की प्राण. हे खेकडे बनवण्यासाठी अनेक प्रकारचे पीठ वापरले जाते.
पण इतर ठिकाणी ही रेसिपी नेमकी कशी करतात, हे अनेकांना कदाचित माहिती नसेल. त्यामुळे या खेकड्यांची रेसिपी नेमकी कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी अलिबागच्या राधाबाई पाटील या गृहिणीसोबत लोकल18 च्या टीमने संवाद साधला. हे भरलेले खेकडे कसे बनवतात, हे आपण जाणून घेऊयात.
advertisement
साहित्य - दोन वाटी भाजलेल्या तांदळाचे, चण्याच्या डाळीचे पीठ, काही लसूण पाकळ्या, एक वाटी तेल, खेकडे, थोडी कोथिंबीर, थोडं पाणी, चवीपुरतं मीठ, अद्रक, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण.
कृती - सर्वप्रथम आणलेले सगळे खेकडे दोन भाग करून स्वच्छ धुऊन घ्यावेत. एका ताटात दोन वाटी भाजलेल्या तांदळाचे आणि चण्याच्या डाळीचे पीठ ओतावे. त्यात मसाला, हळद, मीठ, तेल, वाटण टाकून व्यवस्थित मिक्स करावं. पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ते पीठ खेकड्यांमध्ये भरून त्यांना धाग्याने व्यवस्थित बांधून घ्यावं. यामुळे कालवण करताना ते पीठ सुटणार नाही.
advertisement
बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी वेस्टर्न रेल्वेकडून स्पेशल गाड्या, आरक्षण कधीपासून?
खेकडे व्यवस्थित पीठाने भरून झाली की नंतर, गॅस सुरू करून त्यावर टोप ठेवावे. त्या टोपात एक वाटी तेल घालून काही लसूण पाकळ्या आणि हळद टाकावी. त्यानंतर खेकडी त्यामध्ये टाकून वरून मसाला टाकावा आणि तुपावर भांडे ठेवून खेकड्यांना थोडी वाफ द्यावी. खेकडी व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात एक्स्ट्रा राहिलेल्या पिठाचे गोळे करून टाकावे. पाच मिनिटांनी थोडं वाटप आणि मीठ टाकावे. साधारण पुन्हा 10 मिनिटे कालवणाला वाफ द्यावी. अशाप्रकारे आपले गरमागरम भरलेले खेकडे तयार आहेत.
advertisement
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! एसटीच्या 4300 बस तुमच्याचसाठी...
'पाऊस सुरू झाल्यानंतर गावातील लहान मुलांना या रेसिपीचे वेध लागतात. लहान मोठे सगळ्यांचाच हा आवडीचा पदार्थ आहे,' असे गृहिणी असणाऱ्या राधा पाटील यांनी सांगितले. तर अशाप्रकारे तुम्ही भरलेली खेकडी बनवून गटारीचा सण साजरा करू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2024 12:35 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
कोकणातील प्रसिद्ध भरलेले खेकडे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल; जाणून घ्या, या आवडीच्या पदार्थाची रेसिपी