Mumbai Traffic Update : मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट! आजपासून 'या' वाहनांना बंदी, जाणून घ्या वेळ आणि मार्ग
Last Updated:
Heavy Vehicle Restrictions On Mumbai : मुंबईत आजपासून अवजड वाहनांना तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 12 जेपर्यंत राहणार आहे.
मुंबई: मुंबईत आजपासून अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी 20 सप्टेंबरपासून सुरू होऊन 2 ऑक्टोबरपर्यंत चालेल. दररोज सकाळी 6 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना अपवाद दिला आहे.
वाहतूक बंदीचे कारण काय?
नवरात्रोच्या उत्सवाच्या काळात मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय महापालिकेकडून घेतला गेला आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि रस्त्यांवरील जाम टाळण्यासाठी ही पावले उचलली आहेत. त्यामुळे या काळात नागरिकांनी वैकल्पिक योजना आखणे गरजेचे आहे.
ठाणे आणि नवी मुंबईहून येणाऱ्या तसेच मुंबईमध्ये प्रवेश करून ठाणे दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना ऐरोली, आनंदनगर आणि चेक नाक्यावरून प्रवेश बंद राहणार आहे. जे वाहन या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
advertisement
नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय रस्त्यांवरील जाम कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास मिळवून देण्यासाठी घेतला आहे. अवजड वाहनांना बंदी असल्यामुळे वाहतुकीत जास्तीत जास्त सुरळीतपणा येईल तसेच रस्त्यांवर अपघाताची शक्यता कमी होईल.
या बंदीचा प्रभाव मुख्यतहा मालवाहतुकीच्या वाहनांवर होईल. नागरिकांनी आणि प्रवाशांनी हे लक्षात घेऊन आपले प्रवासाचे नियोजन करावे. सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहनं आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने नियमांमध्ये अपवाद आहेत. त्यामुळे त्यांना प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही.
advertisement
नागरिकांनी या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. कारण नियम मोडल्यास कडक कारवाई केली जाईल. मुंबईतील रहिवासी आणि प्रवासी या काळात सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतील, अशी अपेक्षा महापालिकेने व्यक्त केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 9:11 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Traffic Update : मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट! आजपासून 'या' वाहनांना बंदी, जाणून घ्या वेळ आणि मार्ग