Dahi Handi 2025: राज्य सरकारचा मोठा निर्णय! गोविंदांना मिळणार 10,00,000 रुपयांचं विमा कवच, अट काय?

Last Updated:

Dahi Handi 2025: दहीहंडी उत्सवाच्या पूर्वीच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा दीड लाख गोविंदांना 10 लाख रुपयांचं विमा कवच मिळणार आहे.

Dahi Handi 2025: राज्य सरकारचा मोठा निर्णय! दीड लाख गोविंदांना मिळणार 10,00,000 रुपयांचं विमा कवच
Dahi Handi 2025: राज्य सरकारचा मोठा निर्णय! दीड लाख गोविंदांना मिळणार 10,00,000 रुपयांचं विमा कवच
मुंबई: दहीहंडीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून गोविंदा पथके तयारीला लागली आहेत. राज्य सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्यामुळे या उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचे प्रमाण वाढले आहे. आता याच गोविंदांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील दीड लाख गोविंदांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचं विमा कवच देण्यात आलं आहे.
दहीहंडी उत्सवात उंचच उंच मानवी मनोरे बनवले जातात. त्यामध्ये अपघाताचा धोका अधिक असतो. परंतु, दहीहंडीला राज्य सरकारने साहसी खेळाचा दर्जा देत विमा संरक्षण देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण या योजनेतून दिलं जातंय. विशेष म्हणजे त्यासाठी 6 टप्पे करण्यात आले आहेत. गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 10 लाख रुपये दिले जाणार आहेत.
advertisement
यंदा 16 ऑगस्टला राज्यात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी राज्यातील दीड लाख गोविंदांच्या विम्याचा प्रीमियम सरकार भरणार आहे. महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशन, मुंबई ही संस्था गोविंदांचे प्रशिक्षण, आरोग्य आणि भागीदारीसाठी नियुक्त केली आहे. गोविंदांना 6 टप्प्यात विम्याचं संरक्षण मिळेल. दहीहंडी दरम्यान मृत्यू झाल्यास गोविंदांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल. तसेच कायमस्वरूपी अपंगत्व, दोन्ही डोळे किंवा इतर अवयवांचं नुकसान झाल्यास 10 लाख रुपयांचंच विमा कवच असेल. तर एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावणाऱ्या गोविंदांना 5 लाख रुपये मिळतील.
advertisement
दरम्यान, दहीहंडीवेळी जखमी झाल्यास 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे. गोविंदांची सुरक्षा आणि कल्याणासाठी राज्य सरकारने ही योजना आणली आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Dahi Handi 2025: राज्य सरकारचा मोठा निर्णय! गोविंदांना मिळणार 10,00,000 रुपयांचं विमा कवच, अट काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement