दर कमी होणार की वाढणार? अटल सेतूच्या टोलबाबत सरकारचा मोठा निर्णय

Last Updated:

No Hike in Atal Setu: अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दर कमी होणार की वाढणार? अटल सेतूच्या टोलबाबत सरकारचा मोठा निर्णय
दर कमी होणार की वाढणार? अटल सेतूच्या टोलबाबत सरकारचा मोठा निर्णय
मुंबई: मुंबईतील अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्मय घेतला आहे. शिवडी – नाव्हाशेवा अटल सेतूच्या टोल दरांत पुढील वर्षभर कोणतीही वाढ होणार नाही. प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच 250 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांसह मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नुकतेच एसटी आणि रिक्षाची भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांत संतापाचं वातावरण आहे. आता राज्य सरकारने पुढील 12 महिन्यांसाठी अटल सेतूवरील टोलचे दर कायम ठेवून मुंबईसह उपनगरांतील प्रवाशांना काहीसा दिलासा दिला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2024 मध्ये अटल सेतूचं उद्घाटन केलं होतं. राज्य सरकारने अटल सेतूवरून जाणाऱ्या कारसाठी एका वेळेला 250 रुपये टोल ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील शिवडी ते न्हावा शेवा यांना जोडणार अटल सेतू हा महत्त्वाचा पायभूत सुविधा प्रकल्प आहे. यामुळे प्रवासाच्या वेळात लक्षणीय घट झाली आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशात कनेक्टिव्हिटी देखील वाढली आहे.
advertisement
आता राज्य सरकारने अटल सेतूवरील जुनेच दर पुढील 12 महिन्यांसाठी कायम ठेवले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच या निर्णयाचा मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानची वाहतूक सुरळीत होण्यासाठी देखील प्रवाशी, व्यवसायिक आणि इतरांना फायदा होणार आहे. अटल सेतूमुळे मुंबईतील गर्दी कमी होण्यास देखील मदत झाली असून व्यापारासाठी देखील मोठा फायदा झाला आहे. त्यामुळेच हा अटल सेतू पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रतिक बनले आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
दर कमी होणार की वाढणार? अटल सेतूच्या टोलबाबत सरकारचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement