Maharashtra Weather Updates : राज्यात थंडीचा कडाका, 3 जिल्ह्यांना शीतलहरीचा इशारा, IMD नं दिला अलर्ट

Last Updated:

पुढील दोन दिवस राज्यातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने शीतलहरीचा इशारा दिला आहे. पुणे आणि पुण्याचा घाटमाथा नाशिक आणि नाशिकचा घाटमाथा तसेच अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने शीतलहरीचा इशारा दिला आहे.

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
मुंबई : पुढील दोन दिवस राज्यातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने शीतलहरीचा इशारा दिला आहे. पुणे आणि पुण्याचा घाटमाथा नाशिक आणि नाशिकचा घाटमाथा तसेच अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने शीतलहरीचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा 11 अंशापर्यंत खाली आला आहे. विदर्भ आणि मुंबईमध्ये त्यामानाने किमान तापमान अधिक असल्याचे पाहायला मिळतंय. पाहुयात 30 नोव्हेंबर रोजी राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात पुढील काही दिवसांमध्ये तापमानात काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे.
advertisement
पुणे शहरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी शीतलहरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळच्या वेळी धुके राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर मात्र आकाश ढगाळ होणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढं राहील. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये ही थंडीचा जोर कायम आहे. नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस एवढं राहील. उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा पुढील काही दिवसांमध्ये मिळणार आहे. किमान तापमानामध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सकाळच्या वेळी धुक आणि ढगाळ आकाश राहणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यामध्ये पुढील दोन दिवस थंडी जाणवणार असून त्यानंतर किमान तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Weather Updates : राज्यात थंडीचा कडाका, 3 जिल्ह्यांना शीतलहरीचा इशारा, IMD नं दिला अलर्ट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement