Thackrey Alliance : ऐतिहासिक युती जाहीर करताच ठाकरेंचे दोन मास्टरस्ट्रोक! कटेंगे तो बटेंगे अन् मराठीच महापौर होणार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Uddhav Raj Thackeray Alliance : ठाकरेंच्या युतीचा पहिला मास्टरस्ट्रोक टाकला. तर मुंबईत मराठीच महापौर होणार, असं म्हणत राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली
Uddhav Raj Thackeray Alliance : तब्बल 18 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा अध्याय लिहायला सुरूवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. अशातच आता ऐतिहासिक युती जाहीर करताच ठाकरेंचे दोन मास्टरस्ट्रोक पहायला मिळाले.
विधानसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपने बटेंगे तो कटेंगे असा प्रचार केला होता. पण मराठी माणसाला सांगतोय की, आता जर चुकाल तर संपाल... आता फुटाल तर संपून जाल. मराठीचा वसा टाकू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले अन् ठाकरेंच्या युतीचा पहिला मास्टरस्ट्रोक टाकला. तर मुंबईत मराठीच महापौर होणार, असं म्हणत राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली.
advertisement
ज्याची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती, ती युती झाली असं घोषणा करून राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली आहे. मुंबईचा महापौर आमचाच होणार आणि मराठीच होणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ फिरतोय, ज्यात ते अल्ल्हाहूँ अकबर म्हणताना दिसतायेत. माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी बॉम्ब फोडला.
advertisement
जागावाटप जाहीर का केलं नाही?
सध्या महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहेत. त्यात आणखी दोन टोळ्या अॅड झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधील मुलं पळवतात. जे निवडणुका लढवणार आहेत. त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. कधी आणि कुठे उमेदवारी भरायची त्यांना सांगितलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 12:56 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Thackrey Alliance : ऐतिहासिक युती जाहीर करताच ठाकरेंचे दोन मास्टरस्ट्रोक! कटेंगे तो बटेंगे अन् मराठीच महापौर होणार!










