BDD वासियांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस ठरला, 'या' दिवशी मुख्यमंत्री देणार नव्या फ्लॅटच्या चाव्या!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
BDD Home: वरळीतीली बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी खूशखबर आहे. लवकरच या चाळीतील रहिवाशांना हक्काची घरे मिळणार असून मुहूर्त ठरला आहे.
मुंबई: मुंबईतील बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वरळीच्या बीडीडी चाळीतील हरिवाशांना हक्काची घरे मिळण्यासाठी आता वाट पाहावी लागणार नाही. विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंर लगेचच 21 जुलै रोजी घरांच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घराच्या चाव्या चाळीतील रहिवाशांना देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 500 चौरस फुटाच्या 556 फ्लॅट्सचे वाटप करण्यात येणार असल्याचे म्हाडा मुंबई बोर्डाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.
“वर्षअखेरीस आम्हाला तीन ठिकाणी 3 हजार 989 फ्लॅट्स मिळणार आहेत,” अशी माहितीही बोरीकर यांनी दिलीये. बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पाची नोडल एजन्सी म्हणून म्हाडा काम पाहात आहे. एकीकडे फ्लॅट्स देण्याची तयारी सुरू असतानाच म्हाडाने कंत्राटदार टीसीसी कन्स्ट्रक्शन कंपनीला वेळेवर फ्लॅट्स न दिल्याबद्दल नोटीस बजावली आहे. तसेच 13 कोटी रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. यात दंडासह एस्केलेशन चार्जेस आणि न भरलेले नुकसान समाविष्ट आहे. म्हाडाकडून 2 जुलै रोजी ही नोटीस बजावण्यात आली.
advertisement
बीडीडी पुनर्वसन प्रकल्पात प्रत्येक विंग 40 मजल्यांची आहे. इमारत क्रमांक 1 मधील डी आणि ई विंगमध्ये पहिल्यांदा 556 घरांचा ताबा देण्यात येईल. दरम्यान, या इमारतींना आधीच अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र मिळाले असून पाणी आणि वीज जोडणी देखील देण्यात आली आहे. ऑक्युपेशन सर्टिफिकेटसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला असून पुढील काही दिवसांत तो देखील मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
कुणाला मिळणार फ्लॅट?
बीडीडी चाळीतील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. आता परळमधील श्रीनिवास आणि सेंच्युरी मिल्स येथील म्हाडाच्या मालकीच्या ट्रान्झिट फ्लॅटमध्ये स्थलांतरित रहिवाशांना पहिल्या लॉटमध्ये घरे मिळणार आहेत. पहिल्यांदा नव्या इमारतींमध्ये त्यांचे पुनर्वसन केले जाईल. या इमारतीला आठ विंग असून प्रत्येक विंग ४० मजली उंच आहे.
बीडीडी चाळीतील विविध इमारतीच्या कामांना निश्चित वेळेपेक्षा 2 ते 11 महिन्यांचा विलंब झाला आहे. गतवर्षी जुलैमध्ये डी आणि ई विंग म्हाडाला सुपूर्द करण्यात येणार होत्या. परंतु, आता 31 जुलैला या विंग सुपूर्द केल्या जातील. बी, सी, एफ आणि जी या विंगला देखील 9 महिने तर ए आणि एच विंगला प्रत्येकी 2 महिने विलंब झाल्याचे नोटिसीत म्हटले आहे. कंत्राटदाराने या नोटिशीला उत्तर दिले असून काळजीपूर्वक तपासणी करून निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, यंदा वर्षअखेर किंवा पुढच्या वर्षारंभी बीएमसी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महायुकीत सरकार जास्तीत जास्त रहिवाशांचे आणि विशेषत: मराठी भाषिकांचे पुनर्वसन फ्लॅटमध्ये करण्याच्या प्रयत्नात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 2:55 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BDD वासियांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस ठरला, 'या' दिवशी मुख्यमंत्री देणार नव्या फ्लॅटच्या चाव्या!