advertisement

Mumbai : MMRDA ने तिजोरी उघडली! मुंबईचा कायापालट होणार, कोणत्या प्रकल्पाला किती निधी?

Last Updated:

MMRDA Budget 2026 : एमएमआरडीएच्या 2026-27 अर्थसंकल्पात मुंबई मेट्रो प्रकल्पांना मोठा निधी मिळाला आहे. शहर आणि उपनगरांतील विविध मार्गिकांसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ते जाणून घ्या.

MMRDA Mumbai Metro budget 2026 details
MMRDA Mumbai Metro budget 2026 details
मुंबई : मुंबई हे राज्यातील आर्थिक आणि विकासाचे शहर मानले जाते. सध्या या शहरात आणि उपनगरांमध्ये अनेक महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मेट्रो प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. एमएमआरडीने मुंबई शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी किती कोटींचे तरतूद केली आहे तेही जाणून घेऊयात आणि नेमके किती मेट्रो प्रकल्प सुरु आहेत तेही सविस्तर समजून घेऊयात.
मेट्रोसाठी एमएमआरडीएचा मोठा प्लॅन
सध्या सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एमएमआरडीचा 48,072 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. यातील तब्बल 87 टक्के निधी विविध पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे 2017-18 नंतर प्रथमच 17 लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे.
महामुंबई परिसरात सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी 42,026.14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 13,836.77 कोटी रुपये मेट्रो प्रकल्पांसाठी देण्यात आले आहेत. मुंबईतील मेट्रोचे जाळे शहराबरोबरच उपनगर आणि नव्या विकास क्षेत्रांपर्यंत विस्तारले जात आहे.
advertisement
कोणत्या मेट्रोचा मार्गाचा समावेश?
या निधीत वडाळा-कासारवडवली, स्वामी समर्थ नगर-कांजूरमार्ग, ठाणे-भिवंडी-कल्याण आणि दहिसर-मिरा भाईंदर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांचा समावेश आहे. तसेच तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या विकास क्षेत्रासाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आसपासच्या शहरांतील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : MMRDA ने तिजोरी उघडली! मुंबईचा कायापालट होणार, कोणत्या प्रकल्पाला किती निधी?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement