advertisement

Mumbai : ट्रॅफिकमुक्त अन् सुसाट मुंबई! MMRDA कडून तयार 'मेगा प्लॅन' तयार, कोणत्या प्रोजेक्टला किती निधी?

Last Updated:

MMRDA Budget : ट्रॅफिकची कोंडी कमी करून मुंबईला सुसाट करण्यासाठी एमएमआरडीएने मेगा पायाभूत आराखडा तयार केला आहे. ज्यात कोणत्या प्रकल्पांचा समावेश आहे ते जाणून घ्या.

MMRDA 2026-27 budget details in Mumbai
MMRDA 2026-27 budget details in Mumbai
मुंबई : मुंबई हे राज्यातील आर्थिक केंद्र मानले जाते आणि सध्या शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. नुकताच एमएमआरडीए ने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 48,072 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. त्यातील सुमारे 87 टक्के निधी विविध विकासकामांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
मुंबईच्या विकासाचा 'मेगा प्लॅन'
नवी मुंबईनंतर तिसरी मुंबई विकसित करण्यासाठी सुमारे 4,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ज्यात महत्त्वाचे म्हणजे रस्ते आणि द्रुतगती मार्ग प्रकल्पांसाठी 42,026 कोटींची मोठी तरतूद आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतू तेछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 दरम्यान भुयारी रस्ता प्रकल्पासाठी 24 हजार कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यंदा 1,189 कोटींची तरतूद आहे.
advertisement
कोणत्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश?
ठाणे-बोरिवली आणि ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पांसाठी 5,543 कोटींपेक्षा जास्त निधी राखीव आहे याशिवाय अटल सेतू ते मुंबई-पु्णे एक्सप्रेसवे जोडणी, ठाणे कोस्टल रोड, कल्याण रिंग रोड, पूर्व मुक्तमार्ग विस्तार आणि मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
कोणत्या प्रोजेक्टसाठी किती निधी?
1)मुख्य वाहतूक मार्गांची जोडणी आणि मल्टी-रिंग रोड नेटवर्क - 12,816.53 कोटी रुपये
advertisement
2)अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जोडणी - 603 कोटी रुपये
3)आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग - 880.12 कोटी रुपये
4)ठाणे कोस्टल रोड (बाळकुम-गायमुख) - 1,025.77 कोटी रुपये
5)फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत मार्ग -75 कोटी रुपये
6)कल्याण रिंग रोड - 600 कोटी रुपये
7)वरळी-शिवडी उन्नत कॉरिडॉर - 936.07 कोटी रुपये
advertisement
8)विस्तारित मुंबई शहरी पायाभूत सुविधा प्रकल्प- 2,362.20 कोटी रुपये
9)मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग कॉरिडॉर (उत्तन-विरार सी लिंक) -2,000 कोटी रुपये
10)मुंबई ते समृद्धी द्रुतगती मार्ग जोड रस्ता (साकेत ते आमणे)- 500 कोटी रुपये
11)पूर्व मुक्तमार्ग विस्तार (छेडानगर, घाटकोपर ते ठाणे)-1,106.75 कोटी रुपये
12)कल्याण-मुरबाड ते बदलापूर रस्ता (वालधुनी नदीलगत उन्नत रस्ता)- 200 कोटी रुपये
advertisement
13)गायमुख ते पायगाव खाडी पूल -682.10 कोटी रुपये
14)कासारवडवली, ठाणे ते खारबाव खाडी पूल- 840.71 कोटी रुपये
15)कोलशेत, ठाणे ते काल्हेर, भिवंडी खाडी पूल -105.51 कोटी रुपये
16)राष्ट्रीय महामार्ग 4 ते काटई नाका उन्नत रस्ता - 900 कोटी रुपये
या प्रकल्पांसाठी एमएमआरडीए कर्ज, जमीनविकास आणि शहरी परिवहन निधीच्या माध्यमातून मोठा निधी उभारणार आहे. या कामांमुळे मुंबई आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : ट्रॅफिकमुक्त अन् सुसाट मुंबई! MMRDA कडून तयार 'मेगा प्लॅन' तयार, कोणत्या प्रोजेक्टला किती निधी?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement