Mumbai : मुलीच्या बॉयफ्रेंडलाच पटवलं, जाळ्यात ओढताच बनवला मास्टर प्लान, मुंबईच्या महिलेचा खतरनाक खेळ!

Last Updated:

आई मुलीच्याच बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडली, यानंतर तिने स्वत:च्याच घरात असं काही कृत्य केलं की फक्त कुटुंबच नाही तर पोलिसांनाही धक्का बसला.

मुलीच्या बॉयफ्रेंडलाच पटवलं, जाळ्यात ओढताच बनवला मास्टर प्लान, मुंबईच्या महिलेचा खतरनाक खेळ! (AI Image)
मुलीच्या बॉयफ्रेंडलाच पटवलं, जाळ्यात ओढताच बनवला मास्टर प्लान, मुंबईच्या महिलेचा खतरनाक खेळ! (AI Image)
मुंबई : आई मुलीच्याच बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडली, यानंतर तिने स्वत:च्याच घरात असं काही कृत्य केलं की फक्त कुटुंबच नाही तर पोलिसांनाही धक्का बसला. महिलेने स्वत:च्याच घरातले सोन्याचे दागिने चोरले, पण यानंतर ती पळून गेली नाही, तर असा काही खेळ खेळली की सत्य समोर येताच अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
रमेश धोंडू हळदिवे आपल्या कुटुंबासह मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात राहतात. उर्मिला आणि रमेश यांच्या लग्नाला 18 वर्ष झाली होती. उर्मिलाने एक दिवस पतीला कपाटातून तिचे दागिने गायब झाल्याचं सांगितलं. एवढच नाही तर तिने पती रमेशवरच दागिने चोरल्याचा आरोप केला, यानंतर तिने दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दाखल केली.

मुलीचा प्रियकरच आईचा बॉयफ्रेंड

advertisement
पोलिसांना तपासामध्ये बाहेरच्या कोणत्याच व्यक्तीवर संशय आला नाही, त्यामुळे त्यांनी कुटुंबातल्या सदस्यांचे कॉल रेकॉर्ड आणि फोन लोकेशन तपासायला सुरूवात केली. तेव्हा उर्मिला बाहेरच्या एका व्यक्तीसोबत सतत संपर्कात असल्याचं लक्षात आलं. याच व्यक्तीसोबत उर्मिलाने घरातून पळून जायचा प्लान केला होता. उर्मिलाने 100 ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरातून चोरले आणि विकले, यातून तिला 10 लाख रुपये मिळाले. हे पैसे तिने प्रियकराच्या खात्यात ट्रान्सफर केले.
advertisement
पोलिसांनी सखोल तपास केला असता आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या. उर्मिलाचा बॉयफ्रेंड हा दुसरा तिसरा कुणीही नसून तिच्या 18 वर्षांच्या मुलीचाच प्रियकर होता. त्याच्यासोबतच उर्मिला वारंवार बोलत होती आणि पळून जायचं प्लानिंग करत होती.

बॉयफ्रेंडने कबूल केला गुन्हा

सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी उर्मिलाच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली. तपासामध्ये त्याने उर्मिलाने आपल्याला दागिने दिल्याचं मान्य केलं. यानंतर पोलिसांनी उर्मिलाचीही चौकशी सुरू केली, तेव्हा तिने चोरी केल्याचा तसंच नवऱ्याला सोडून पळून जायचा आपला प्लान कबूल केला. उर्मिलाच्या कबुली जबाबानंतर पोलीस त्या ज्वेलरी शॉपमध्ये गेले जिथे उर्मिला आणि तिच्या प्रियकराने दागिने विकले होते. याप्रकरणी उर्मिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे. उर्मिलाला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं असून तिच्या प्रियकराची चौकशी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुलीच्या बॉयफ्रेंडलाच पटवलं, जाळ्यात ओढताच बनवला मास्टर प्लान, मुंबईच्या महिलेचा खतरनाक खेळ!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement