Diwali Bonus: BMC कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट, 31 हजार रुपयांचा बोनस जाहीर, अधिकारी ते कमर्चारी कुणाला किती पैसे?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Diwali Bonus: मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. यंदा दिवाळीत 31 हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा देखील गोड होणार आहे. बीएमसीने 31 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 31 हजार रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, कामगार संघटनांनी 50 हजार रुपये बोनसची मागणी केली होती. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी आहे.
मुंबई महापालिकेतील कामगार संघटनांनी यंदा दिवाळीत 50 हजार रुपयांचा बोनस मिळावा अशी मागणी केली होती. तशी बोलणी देखील कामगार संघटना आणि प्रशासनात सुरू होती. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची बोनसबाबत सकारात्मक भूमिका होती. त्यानुसार गतवर्षीपेक्षा 2 हजार रुपयांची वाढ करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपये बोनस जाहीर केला आहे.
advertisement
अधिकारी ते कर्मचारी कुणाला किती बोनस?
अधिकारी आणि कर्मचारी: 31,000 रुपये
अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी : 31,000 रुपये
महापालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक : 31,000 रुपये
माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित / विनाअनुदानित) : 31,000 रुपये
advertisement
माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित / विनाअनुदानित) : 31,000 रुपये
अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित / विनाअनुदानित) : 31,000 रुपये
अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित) : 31,000 रुपये
सामाजिक आरोग्य स्वयंसेविका भाऊबीज भेट : 14,000 रुपये
बालवाडी शिक्षिका / मदतनीस भाऊबीज भेट : 5,000 रुपये
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 8:53 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Diwali Bonus: BMC कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट, 31 हजार रुपयांचा बोनस जाहीर, अधिकारी ते कमर्चारी कुणाला किती पैसे?