संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी Bad News; बेस्टसह रिक्षा वाहतूक ठप्प होण्याची शक्यता

Last Updated:

दुपारनंतर बेस्टच्या शेकडो गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑफिसवरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.

News18
News18
मुंबई :  मुंबई महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये झालेल्या बिघाडाचा फटका मुंबईकरांना बसू लागला आहे. सर्वच सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस नसल्याने टॅक्सी, रिक्षा, अॅप आधारीत खासगी वाहनांच्या सेवा प्रभावित होऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे याचा फटका बेस्टच्या सेवेवर होणार असून दुपारनंतर बेस्टच्या शेकडो गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑफिसवरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.
शहरातील सीएनजी तुटवड्याचा फटका आता बेस्ट च्या बस सेवेलाही बसू लागला आहे. दुपारनंतर रस्त्यावर धावणाऱ्या शेकडो बसगाड्या इंधनाअभावी डेपोमधून निघणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या गैरसोय होण्याची शक्यता आहे. विशेषतः उपनगरातील अनेक डेपोमध्ये सीएनजीचा पुरवठा अपुरा ठरत असून बेस्ट व्यवस्थापन चिंतेत आहे.

घरी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका

मुंबई आणि उपनगरातील मोठा प्रवासी वर्ग रोजच्या रोज कार्यालय, शाळा, व्यवसायासाठी बेस्ट सेवेवर अवलंबून असतो. मात्र सच्या पाईपलाईनमध्ये झालेल्या बिघाडामुळे सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे बेस्टच्या डेपोमध्ये इंधनाची कमतरता जाणवत आहे. काही डेपोमध्ये सकाळच्या वेळेत उपलब्ध असलेला मर्यादित स्टॉक वेगाने संपत असल्याने दुपारपासून संध्याकाळपर्यंत बससेवा कमी करण्याशिवाय पर्याय राहत नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
advertisement

उपनगरातील बससेवा प्रभावीत होणार

सीएनजी तुटवड्यामुळे उपनगरातील धारावी, वांद्रे, दहिसर, गोरेगाव, मुलुंड आणि भांडुप या भागातील बससेवा सर्वाधिक प्रभावित होणार असल्याचे संकेत आहेत. विशेषतः कार्यालयीन वेळेला घरी जाण्यासाठी बेस्ट हा अनेकांचा एकमेव आणि परवडणारा पर्याय असल्याने संध्याकाळी हजारो मुंबईकरांना फटका बसण्याची शक्यता आहे.

सीएनजीवर चालणाऱ्या खासगी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता

advertisement
वडाळा येथील आरसीएफ परिसरात असणाऱ्या पाईपलाईनमध्ये हा तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे सीएनजी पुरवठा ठप्प आहे. हा बिघाड दुरुस्त होण्यास आणखी किती तास जातील, याबद्दल अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या रस्त्यावर धावत असलेल्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅबचालकांच्या वाहनांमधील सीएनजी देखील संपत आला आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत न झाल्यास मुंबईतील रिक्षा-टॅक्सीसह सीएनजीवर चालणाऱ्या खासगी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता आहे.
advertisement
हे ही वाचा :
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी Bad News; बेस्टसह रिक्षा वाहतूक ठप्प होण्याची शक्यता
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement