'दीदी थांब'म्हणत हाक मारली अन् मोबाईलमधला नको तो व्हिडीओ दाखवला, माटुंग्याच्या हिंदू कॉलनीत खळबळ

Last Updated:

माटुंग्याच्या हिंदू कॉलनीमध्ये, एका व्यक्तीने 21 वर्षीय तरूणीला आवाज देऊन पॉर्न व्हिडिओ दाखवल्याची घटना घडली आहे. माटुंगा पोलिसांकडून अनोळखी व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

'दीदी थांब'म्हणत हाक मारली अन् मोबाईलमधला नको तो व्हिडीओ दाखवला, माटुंग्याच्या हिंदू कॉलनीत खळबळ
'दीदी थांब'म्हणत हाक मारली अन् मोबाईलमधला नको तो व्हिडीओ दाखवला, माटुंग्याच्या हिंदू कॉलनीत खळबळ
मुंबईतील माटुंगा परिसरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. घडलेल्या घटनेमुळे मुंबईच्या माटुंगा परिसरामध्ये नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. माटुंग्याच्या हिंदू कॉलनीमध्ये, एका व्यक्तीने 21 वर्षीय तरूणीला आवाज देऊन पॉर्न व्हिडिओ दाखवल्याची घटना घडली आहे. माटुंगा पोलिसांकडून अनोळखी व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत असून त्या तरूणीच्या कुटुंबियांनी माटुंगा पोलिस स्थानकामध्ये घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या विरोधात नी नावी तक्रार नोंद करून घेतली आहे.
मुंबईच्या माटुंगा परिसरातील हिंदू कॉलनीमध्ये 2 डिसेंबर रोजी रात्री 11:45 वाजेच्या सुमारास एक विचित्र घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने भररस्त्यात 21 वर्षीय तरुणीला अडवून मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार घडला आहे. मालाडहून दादरला परतणाऱ्या तरुणीला लखमशी नापू रोडच्या कोपऱ्यावर या घटनेला सामोरे जावे लागले आहे. त्या तरूणीने आरडाओरडा केल्यावर आरोपी पळून गेला. या घटनेनंतर तरुणीने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा या प्रकरणी दाखल केला आहे. ऑफिस वरून घरी परतत असताना तरूणीसोबत हा विचित्र प्रकार घडला आहे.
advertisement
21 वर्षीय तरूणी दादर परिसरातील रहिवाशी आहे आणि ती नोकरीसाठी मालाडमध्ये आहे. जॉबवरून घरी परतत असताना त्या तरूणीसोबत हा प्रकार घडला आहे. मंगळवारी (2 डिसेंबर 2025) रात्री 11.45 वाजेच्या सुमारास लोकलने दादर रेल्वे स्थानकावर उतरली. चालत घरी जात असताना तिला हिंदू कॉलनी जवळ एका अज्ञात व्यक्तीने हाक मारली, त्याने तिला हाक मारून थांबवले. त्या व्यक्तीने तरूणीला 'दीदी थांब' अशी हाक मारून तिला थांबवला. तरूणी थांबताच त्या व्यक्तीने तिला मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ दाखवला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरूणी आरडाओरडा केला. तरूणीने आरडाओरडा केल्यामुळे त्या व्यक्तीने तिथून पळ काढला.
advertisement
तरूणीने त्या व्यक्तीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतू तो काही केल्या तिच्या तावडीत सापडला नाही. घटना घडल्यानंतर ती तरूणी घरी गेली. घरी परतल्यानंतर त्या तरूणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई- वडिलांना सांगितला. त्यांनी माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
'दीदी थांब'म्हणत हाक मारली अन् मोबाईलमधला नको तो व्हिडीओ दाखवला, माटुंग्याच्या हिंदू कॉलनीत खळबळ
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement