Mumbai Crime : दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, रागाच्या भरात पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर

Last Updated:

Mumbai News: मुंबईतील गोवंडीमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शुल्लक कारणांवरून संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीला संपवलं.

दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, रागाच्या भरात पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर
दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, रागाच्या भरात पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर
मुंबई: किरकोळ कारणांमुळे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या घटना मागील काही काळांपासून समोर येत आहे. मुंबईतील गोवंडीमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शुल्लक कारणांवरून संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीला संपवलं. पोलिसांनी आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या.
पत्नीने तयार केलेली बिर्याणी खारट झाल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आली आहे. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली असल्याची माहिती आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.
नाजिया परवीन (वय २३) असे मृत तरुणीचे नाव असून, दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह मंजर हुसेन याच्याशी झाला होता. हे दाम्पत्य गोवंडीतील बैगनवाडी परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ कारणांवरून दोघांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
advertisement
१९ डिसेंबर रोजी सायंकाळी नाजियाने घरात बिर्याणी बनवली होती. मात्र बिर्याणी खारट झाल्याने मंजर हुसेन संतापला. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात मंजरने नाजियाला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिचे डोके जोरात भिंतीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली.
नाजियाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पतीने सुरुवातीला वेगवेगळी कारणे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तपासादरम्यान सत्य उघड झाले.
advertisement
शिवाजीनगर पोलिसांनी मंजर हुसेन याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. किरकोळ घरगुती वादातून घडलेली ही घटना परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, रागाच्या भरात पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर
Next Article
advertisement
Mumbai Crime : दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, रागाच्या भरात पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर
दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर
  • दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर

  • दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर

  • दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर

View All
advertisement