Mumbai Crime : मध्यरात्री पत्नी 'नको तिथे' दिसली... दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली, भांडूपमध्ये भयानक घडलं!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नवरा बायको रात्री जेवून झोपी गेले होते.त्यानंतर अचानक मध्यरात्री नवऱ्याला जाग आली होती.यावेळी त्याने बिछाण्यावर पाहताच त्याची बायकोच नव्हती. त्यानंतर त्याने घरात शोधाशोध केली, पण त्याला ती भेटलीच नाही. शेवटी त्याला जुना जो संशय होता.
Mumbai Crime News : संकेत वरक, मुंबई : मुंबईच्या भांडूपमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत नवरा बायको रात्री जेवून झोपी गेले होते.त्यानंतर अचानक मध्यरात्री नवऱ्याला जाग आली होती.यावेळी त्याने बिछाण्यावर पाहताच त्याची बायकोच नव्हती. त्यानंतर त्याने घरात शोधाशोध केली, पण त्याला ती भेटलीच नाही. शेवटी त्याला जुना जो संशय होता. त्या संशयानुसार तो तिच्या प्रियकराच्या घरात गेला आणि त्यानंतर जे घडलं ते खूपच भयानक होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित नवरा हा भांडूप परिसरात आपल्या आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीने घरात दागिन्यांची चोरी केली होती.या प्रकरणी सासूच्या तक्रारीवरून पोलिसांनी अटक करत तुरुंगवास घडवला होता. त्यानंतर तुरुंगातून सुटल्यानंतर तिने भांडूप परिसरातच एक घर भाड्याने घेतलं होतं आणि घरकाम करून उदरनिर्वाह सूरू केला होता. दरम्यानच्या काळात तक्रारदार नवऱ्याची पत्नी गेल्या दोन वर्षांपासून वेगळी राहत होती.मात्र ती अधूनमधून पतीला भेटण्यासाठी यायची.
advertisement
दरम्यान तिचे सुनील(नाव बदलेलं)नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली होती.तक्रारदार नवऱ्याची पत्नी सुनीलच्या घरी घर काम करायची, ही गोष्ट तिच्या नवऱ्याला अजिबात पटायची नाही,त्यामुळे तो सुनीलच्या घरी कामासाठी जाऊ नकोस, असेही सांगायचा,पण तिने नवऱ्याची गोष्ट अजिबात ऐकली नाही आणि आपलं काम सूरूच ठेवलं होतं. तसेच तक्रारदार पतीने अनेकदा आपल्या पत्नीला या कथित प्रेम प्रकरणासंदर्भात विचारणा केली मात्र तिने नकार दिला होता. त्यानंतर पुन्हा सगळं सुरळीत सूरू झालं होतं.
advertisement
16 मार्च रोजी रात्री पत्नी आपल्या पतीच्या घरी गेली.रात्रीचे दहा वाजले असल्याने दोघांनी जेवण केलं आणि झोपी गेले. मात्र रात्री 1 वाजता पतीची अचानक झोप उडाली अन् तो जागा झाला. शेजारी पाहिलं तर पत्नी नव्हती.घरभर शोधलं पण पत्नी सापडली नाही.पत्नी अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.त्यामुळे तो रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडला आणि त्यांनी थेट सुनीलच घर गाठलं. पण अनेकदा दार ठोठावूनही प्रतिसाद न दिल्याने त्याने दार तोडून आत प्रवेश केला.आत जाताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.कारण त्याची पत्नी आणि सुनील दोघेही घरात होते.रात्री एक वाजता आपली पत्नी एका भलत्याच पुरूषाच्या घरात असल्याचं पाहून त्याला राग अनावर झाला आणि त्याने पत्नीला याबाबत विचारणा केली असता ती उत्तर न देताच तिथून पळून गेली.
advertisement
त्यानंतर भडकलेल्या नवऱ्याने गाड झोपलेल्या सुनीलला उठवलं आणि माझी पत्नी इतक्या रात्री तुझ्या घरात काय करते? असा सवाल केला. संतापलेल्या सुनीलनेही तक्रारदाराला शिविगाळ केली आणि जोरदार वाद झाला.या वादाला पुढे जाऊन हिंसक वळण लागलं.सुनीलने घरातून चाकू आणत “तुला संपवतो” अशी धमकी देत तक्रारदारावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, हातावर आणि मानेला गंभीर जखमा झाल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत तो खाली कोसळला. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले.मात्र तोपर्यंत आरोपी सागर तिथून फरार झाला होता. जखमी अवस्थेत तक्रारदाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर भांडुप परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
दरम्यान या प्रकरणी आरोपी विरोधात भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. प्रेमसंबंधाच्या संशयातून उफाळलेला हा वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 9:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : मध्यरात्री पत्नी 'नको तिथे' दिसली... दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली, भांडूपमध्ये भयानक घडलं!










